WTC Final : विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराला बाद करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने केले बॉल टेम्परिंग? पाकिस्तानी क्रिकेटपटूचा मोठा आरोप


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियन टीमवर खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने कांगारू संघावर हा आरोप केला आहे. हा आरोप बॉल टेम्परिंगचा आहे. विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराला बाद करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने बॉल टेम्परिंग केल्याचा दावा पाकिस्तानचा माजी खेळाडू बासित अलीने केला आहे. मात्र, याकडे कोणाचेच लक्ष लागले नाही.

बासित अली त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला, सर्वप्रथम, मला टाळ्या वाजवायच्या आहेत की हे सर्व घडले, तरीही ते कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेले किंवा मैदानावर उभे असलेल्या पंचांना दाखवले गेले नाही. ऑस्ट्रेलियाने चेंडूशी कशी छेडछाड केली, हे स्पष्टपणे दाखवण्यात आले आहे. पण त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही. तसेच कोणत्याही फलंदाजाला आश्चर्य वाटले नाही. हे काय होत आहे?”

माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूने असेही सांगितले की, भारतीय डावाच्या 16व्या आणि 18व्या षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाने चेंडूशी छेडछाड केल्याचा स्पष्ट पुरावा आहे. त्यासाठी त्याने पुजारा आणि विराट कोहलीच्या विकेट्सचा स्पष्ट उल्लेख केला. बासितने सांगितले की, 18व्या षटकात पंचांच्या सूचनेनुसार चेंडू बदलण्यात आला, कारण त्याचा आकार खराब झाला होता. पण जेव्हा बॉल्सचा बॉक्स पुन्हा मैदानावर आला, तेव्हा नवीन चेंडू घेण्यात आला.


अलीने 16व्या, 17व्या आणि 18व्या षटकाचे उदाहरण दिले. विराट कोहली ज्या चेंडूवर आऊट झाला, त्याचाही उल्लेख त्याने केला. पाकिस्तानी दिग्गज म्हणाला, तुम्हाला त्या चेंडूची चमक दिसत आहे. मिचेल स्टार्कच्या हाती लागलेल्या चेंडूत त्याचा चमकदार भाग बाहेरच्या बाजूला होता. पण तरीही चेंडू दुसरीकडेच जात होता. त्याचप्रमाणे जडेजाने शॉट खेळला, तेव्हा त्याने चेंडू ऑन साइडच्या दिशेने मारला, पण चेंडू ओव्हर पॉईंटवर गेला. पंच आंधळा होता का असा प्रश्न पडतो. ही गोष्ट तिथे बसलेल्या कुणाला का दिसली नाही, हे फक्त वरील लोकांनाच माहीत.

आम्ही तुम्हाला सांगतो की ऑस्ट्रेलियाला बॉल टेम्परिंगचा मोठा इतिहास आहे. 2018 मध्ये डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथवरही यासाठी बंदी घालण्यात आली होती. आता पाकिस्तानी क्रिकेटर बासित अलीच्या वक्तव्यानंतर बॉल टेम्परिंगचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. बासित अलीने पाकिस्तानसाठी 50 वनडे आणि 19 कसोटी खेळले आहेत, ज्यामध्ये या मधल्या फळीतील फलंदाजाने 2000 हून अधिक धावा केल्या आहेत.