Photos : या सुंदर महिलेला हवा ढेरीवाला नवरा, पण मान्य करावी लागेल ही अट


सोशल मीडियावर एका मुलीचे लाखो फॅन्स आहेत, पण तिला डॅशिंग लूकचा नको, तर ढेरपोट्या नवरा हवा आहे. हे वाचून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल, पण हे सत्य आहे. होय, ही वेगळी बाब आहे की या सोशल मीडियाच्या प्रभावशाली व्यक्तीने लग्नाबाबत जी अट घातली आहे ती पूर्ण करणे प्रत्येकाच्याच ऐपतीत नसते. चला जाणून घेऊया कोणती अट आहे, ज्यामुळे या सुंदर महिलेला ढेरीवाला जोडीदार हवा आहे.

अल्माटी, कझाकस्तान येथील रहिवासी मदिना मामादालीवा (Madina Mamadalieva) हिला पुरुषांच्या फिगरमध्ये रस नाही. तिची भव्य जीवनशैली परवडेल, असा नवरा तिला हवा आहे. तिच्यासाठी तो डिझायनर कपडे, फॅन्सी सुट्ट्या आणि महागडे जेवण यावर पैसे खर्च करेल.

24 वर्षीय मदीनाला तिच्या जोडीदाराकडून दर महिन्याला 40 हजार पौंड (म्हणजे 41,42,993.50 रुपये) मिळावे अशी अपेक्षा आहे. नवरा ढेरपोट्या असला तरी त्याने तिची काळजीही घेतली पाहिजे, असे तिचे म्हणणे आहे.

बेकायदेशीरपणे कमाई करणाऱ्या व्यक्तीसोबत राहणे तिला आवडणार नाही, असेही तिने स्पष्ट केले आहे. तिला फक्त शांत झोप आणि भव्य जीवनशैलीची गरज आहे.

मदीनाने तिचा पार्टनर इन्स्टाग्रामवर नसावा अशी अट घातली आहे. पण ती स्वत: इन्स्टावर असून 20 लाख लोक तिला फॉलो करतात.