आपल्या मुलीच्या वयाच्या फातिमा सना शेखशी लग्न करणार आमिर खान? या अभिनेत्याने केला मोठा दावा


लाल सिंग चड्ढा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटल्यानंतर आमिर खान लाइमलाइटपासून दूर होता. पण आता पुन्हा एकदा हा अभिनेता प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. आमिर यावेळी त्याच्या कोणत्याही चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात नसला तरी फातिमा सना शेखसोबत पिकल बॉल खेळल्यामुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आहे.


दंगल गर्ल फातिमा सना शेखसोबतचा आमिर खानचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि पुन्हा त्यांच्या डेटींगच्या बातम्या येऊ लागल्या. दरम्यान, अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमाल रशीद खान म्हणजेच केआरकेने खळबळजनक दावा करून सर्वांना आश्चर्यचकित केले.
https://twitter.com/kamaalrkhan/status/1661588622662045697?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1661588622662045697%7Ctwgr%5E5dfd1076527d274d9397d5b5f8a4b93d3cbc7bb6%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9hindi.com%2Fentertainment%2Fbollywood-news%2Fkrk-claims-aamir-khan-and-fatima-sana-shaikh-to-get-marry-soon-1882907.html
केआरकेने गुरुवारी सकाळी ट्विट केले, “ब्रेकिंग न्यूज, आमिर खान लवकरच त्याच्या मुलीच्या वयाच्या फातिमा सना शेखसोबत लग्न करणार आहे. दंगल चित्रपटाच्या वेळेपासून आमिर सनाला डेट करत आहे. केआरकेच्या या दाव्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. दीपक कुमार नावाच्या युजरने पोस्टवर लिहिले की, विश्वास बसत नाही. एकाने केआरकेची खिल्ली उडवत लिहिले की, “एवढी मोठी बातमी दिल्याबद्दल केआरकेचे अभिनंदन.”

फातिमा सना शेख आणि आमिर खान दंगल चित्रपटात एकत्र दिसले होते. या चित्रपटात आमिरने फातिमाच्या वडिलांची भूमिका साकारली होती. यानंतर दोघेही ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटात मोठ्या पडद्यावर एकत्र दिसले होते. या चित्रपटानंतर त्यांच्या डेटींगच्या बातम्या येऊ लागल्या. आमिर आणि फातिमा यांनी अद्याप अशा बातम्यांवर काहीही सांगितलेले नाही.

या अफवांना अधिक बळ मिळाले, जेव्हा आमिर खानने 16 वर्षांनी पत्नी किरण रावपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आता दोघांचा पिकलबॉल खेळतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर रिलेशनशिपच्या बातम्यांना वेग आला आहे.