आयपीएल 2023 च्या मोसमातून आधीच बाहेर पडलेल्या सनरायझर्स हैदराबादला आता पुढच्या हंगामासाठी तयारी करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी संघाला त्यांच्या संघात असे खेळाडू ओळखावे लागतील, ज्यांना पुढील हंगामातही कायम ठेवावे. अशा परिस्थितीत हा संघ काही नवीन खेळाडूंना संधी देत आहे. एका युवा फलंदाजाला अशी संधी मिळाली, ज्याने आपल्या कारकिर्दीतील तिसरा चेंडू असा टोलवला की चेंडूच बदलावा लागला.
IPL 2023 : पहिल्यांदाच जोरदार आक्रमण, नव्या चेंडूचा 3 चेंडूत केला नाश, पुन्हा मुंबईकरांची उडवली झोप
साखळी टप्प्यातील शेवटच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सविरुद्ध काही बदल केले. एक, उमरान मलिक 5 सामन्यांनंतर परतला. तसेच या मोसमात पदार्पण करणाऱ्या 23 वर्षीय अष्टपैलू विव्रत शर्मालाही संधी दिली. याआधीही विव्रतने दोन सामने खेळले होते, मात्र त्यानंतर त्याला फलंदाजीची संधी मिळाली नव्हती.
Viv-a la vida 🔥
A maiden half-century for Vivrant 🤩#IPLonJioCinema #IPL2023 #TATAIPL #MIvSRH #EveryGameMatters | @SunRisers pic.twitter.com/aBIbmXfCUC
— JioCinema (@JioCinema) May 21, 2023
सलामीला मैदानात उतरल्यामुळे विव्रतला मुंबईविरुद्ध ही संधी मिळाली आणि सामन्याच्या तिसऱ्या चेंडूवर विव्रतने दहशत निर्माण केली. जेसन बेहरेनडॉर्फच्या या चेंडूवर डावखुरा फलंदाज विव्रतने त्याच्या पावलांचा वापर करत कव्हर्सवर धारदार शॉट मारला.
यानंतरही विव्रतने आपले आक्रमण सुरूच ठेवले आणि अनुभवी लेगस्पिनर पियुष चावलाच्या दोन षटकांत 2 चौकार आणि 1 षटकार ठोकला. त्याने मयंक अग्रवालसोबत उत्कृष्ट सलामीची भागीदारी रचली आणि अवघ्या 36 चेंडूत आपल्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. इथपर्यंत पोहोचण्यासाठी जम्मू-काश्मीरच्या या फलंदाजाने 7 चौकार आणि 1 षटकार लगावला.
या खेळीदरम्यान त्याने मयंक अग्रवालसोबत उत्कृष्ट भागीदारी रचली. दोघांनी मिळून 140 धावांची सलामीची भागीदारी केली. अखेर 14व्या षटकात विव्रतची दमदार खेळी संपुष्टात आली. त्याने 47 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांसह 69 धावा केल्या. काही सामन्यांनंतर संघात पुनरागमन करणारा अनुभवी फलंदाज मयंक अग्रवालनेही दमदार फलंदाजी करत अर्धशतक झळकावले.