मेंस्ट्रुएशन म्हणजेच मासिक पाळी येण्याचा अनुभव प्रत्येक स्त्रीला वेगवेगळा असू शकतो. काही स्त्रियांसाठी हे त्रासदायक ठरू शकते, तर काही काळासाठी फारशी समस्या नसते. काही स्त्रियांना मासिक पाळी दरम्यान पेटके, मळमळ किंवा जास्त रक्त प्रवाह होऊ शकतो. पण अनेक महिलांना अनियमित मासिक पाळीसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अनियमित मासिक पाळीची स्थिती हार्मोन्सच्या असंतुलनामुळे किंवा औषधांमुळे असू शकते.
आवळा दूर करेल अनियमित मासिक पाळीची समस्या, जाणून घ्या कसा करावा त्याचा आहारात समावेश
तथापि, अनियमित मासिक पाळी व्यवस्थापित करण्याचे अनेक मार्ग आहेत. आहारतज्ञांच्या मते, आवळा महिलांच्या अनियमित मासिक पाळीत फायदेशीर ठरू शकतो. डायटीशियन सुमन गुप्ता यांच्या मते, आवळा फक्त खाण्यासाठीच चविष्ट नसतो, तर पीरियड्सच्या दुखण्यावरही खूप उपयुक्त आहे. व्हिटॅमिन सी असलेल्या फळांपैकी संत्रा आणि आवळा आपली प्रतिकारशक्ती वाढवतातच. यासह ते शरीराला वेदना आणि थकवा यांच्याशी लढण्यास मदत करतात.
आवळ्यामध्ये C, B1, B2, B5 आणि B6 या जीवनसत्त्वांशिवाय कॅल्शियम आणि खनिजे देखील आढळतात. आरोग्य तज्ञांच्या मते, हार्मोनल संतुलन राखण्यासाठी आवळा ही एक अद्भुत आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. त्यामुळे महिलांची मासिक पाळीही नियमित राहते. हे गर्भाशयाला मजबूत करते आणि स्त्रियांची प्रजनन क्षमता सुधारते. आवळा मासिक पाळीदरम्यान शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतो. हे नियमितपणे खाल्ल्याने मासिक पाळीच्या वेदना कमी होतात.
अनियमित मासिक पाळी किंवा वेदनापासून आराम मिळवण्यासाठी रस स्वरूपात याचा वापर करा. महिला आपल्या दिवसाची सुरुवात कोमट पाण्यात आवळा पावडर आणि मध घालून करू शकतात. याशिवाय आवळा ज्यूस किंवा आवळा कँडीही खाऊ शकता.
आवळा आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठीही फायदेशीर आहे. आवळा आपल्या चयापचयामध्ये देखील खूप उपयुक्त आहे. हे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते आणि हार्मोन्सचे संतुलन राखते.