ही आहे जगातील सर्वात महागडी आईस्क्रीम, खाण्यापूर्वी शंभर वेळा विचार करतील श्रीमंतही!


उन्हाळ्यात आईस्क्रीम खायला सगळ्यांनाच आवडते. सध्या उन्हाळा सुरू असल्याने बाजारात विविध प्रकारचे आइस्क्रीमची विक्री सुरू झाली आहे. गुणवत्तेनुसार त्यांची किंमतही बदलते. काही आईस्क्रीम 5, 10 रुपयांना येतात, तर काही 500 किंवा 1000 रुपयांपर्यंत असतात. प्रत्येकजण आपापल्या दर्जानुसार आपल्या आवडीचे आईस्क्रीम खरेदी करतो आणि खातो. पण जगात असे एक आइस्क्रीम आहे, जे विकत घेण्यापूर्वी आणि खाण्यापूर्वी सर्वात श्रीमंत व्यक्तीही शंभर वेळा विचार करेल. कारण ते एकदा खाल्लं म्हणजे तुम्हाला लाखो रुपये पचवावे लागतील.

जर तुम्हाला सर्वात महागड्या आईस्क्रीमच्या किंमतीबद्दल विचार करण्यास सांगितले तर तुम्ही फक्त 1000, 2000 किंवा जास्तीत जास्त 10, 20 हजारांपर्यंतच विचार करू शकाल. पण, जगातील सर्वात महागड्या आईस्क्रीमची किंमत तुमच्या विचारापेक्षा जास्त आहे. जपानची आईस्क्रीम बनवणारी सिलाटोचे प्रथिनेयुक्त आइस्क्रीम बायकुया हे जगातील सर्वात महागडे आइस्क्रीम आहे.

ऑडिटी सेंट्रल न्यूजनुसार, गेल्या महिन्यात म्हणजेच 25 एप्रिल रोजी या नवीन आईस्क्रीमने जगातील सर्वात महागडे आईस्क्रीम बनण्याचा विक्रम केला आहे. या आइस्क्रीमचा बेस दुधापासून बनवला जातो, जो मखमली असतो. त्याच्या घटकांमध्ये दोन प्रकारचे चीज आणि अंड्यातील पिवळ बलक देखील समाविष्ट आहे.

याशिवाय परमिगियानो चीज, व्हाईट ट्रफल ऑइल अशा अनेक गोष्टींचाही या आइस्क्रीम बनवताना समावेश आहे. हे स्टायलिश ब्लॅक बॉक्समध्ये पॅक केले जाते. विशेष म्हणजे हाताने बनवलेला धातूचा चमचाही यासोबत येतो. हे चमचे क्योटोच्या काही कारागिरांनी मंदिर बनवण्याचे तंत्र वापरून बनवले आहेत.

कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर 130ml Byakuya आइस्क्रीमची किंमत $6700 आहे. ही रक्कम 5 लाखांपेक्षा जास्त आहे. पूर्वी असे समजले जात होते की आईस्क्रीमसोबत येणारा चमचा महाग असतो, त्यामुळे त्याची किंमतही वाढवण्यात आली आहे, पण तसे नाही. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने आइस्क्रीमची ही किंमत चमच्याचा हिशोब न करता दिली आहे. निर्मात्याने असे सुचवले आहे की पांढऱ्या वाइनसह हे आइस्क्रीम खाणे हा एक चांगला पर्याय आहे.