Video: शून्याच्या ‘शिखर’वर रोहित शर्मा, रचला खराब रेकॉर्ड, शॉट पाहिल्यानंतर तुम्ही लावाल डोक्याला हात


जेव्हा बॅड पॅच येतो, तेव्हा चांगले फलंदाज कोणत्याही कशाप्रकारे ही बाद होतात, तर चांगले गोलंदाज चांगल्या चेंडूंवरही मार खाऊ लागतात. फलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर वर्षभरापूर्वीपर्यंत विराट कोहली त्याच्या बॅड पॅचच्या काळात अशा प्रकारे विकेट गमावत होता. असेच काहीसे मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मासोबत घडत आहे, ज्याच्या बॅटमधून धावा होत नाहीत. तसेच सलग दुसऱ्या सामन्यात खातेही न उघडताच बाद झाला आणि एक नकोसा विक्रम आपल्या नावावर केला.

चेपॉक स्टेडियमवर शनिवारी 6 मे रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स प्रथम फलंदाजीसाठी उतरला आणि सर्वांना आश्चर्यचकित करून, मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने स्वतः सलामी सोडली आणि कॅमेरॉन ग्रीनला मैदानात उतरवले. रोहित सतत अपयशी ठरत होता आणि म्हणूनच हे पाऊल उचलले गेले, पण हा निर्णयही कामी आला नाही आणि दोन्ही फलंदाज लवकर बाद झाले.

ग्रीन बाद झाल्यानंतर सर्वांना पुन्हा एकदा तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या रोहितकडून पुनरागमनाच्या आशा होत्या, मात्र या आशा पुन्हा धुळीला मिळाल्या. पंजाब किंग्जविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात रोहित पहिल्याच षटकात तीन चेंडूंत शून्यावर बाद झाला होता. यावेळीही गोष्ट बदलली नाही. चेन्नईविरुद्धच्या तिसऱ्या षटकात रोहित केवळ तीन चेंडू खेळून खाते न उघडताच बाद झाला.


यासोबतच आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शुन्यावर बाद होण्याचा नकोसा विक्रम त्याच्या नावावर नोंदवला गेला. एवढेच नाही तर तो आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा बाद होणारा कर्णधार बनला आहे. कर्णधार म्हणून रोहित 11व्यांदा शून्यावर बाद झाला. त्याने गौतम गंभीरला (10) मागे सोडले.

म्हणजेच सलग 2 डावात 6 चेंडू खेळून त्याला एकही धाव करता आलेली नाही. पंजाबविरुद्ध तो तिसऱ्या चेंडूवर मोठा शॉट खेळायला गेला आणि डीप कव्हर्सवर झेलबाद झाला. चेन्नईविरुद्ध तो ज्या पद्धतीने बाद झाला, ते पाहून तो स्वत:च डोके धरणार आहे. चहरच्या चेंडूवर, रोहित विकेटच्या मागे स्कूप शॉट खेळायला गेला, पण चेंडू त्याच्या बॅटला, हातमोजेला आणि नंतर हेल्मेटला लागला आणि पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या हातात सोपा झेल गेला.

हा मोसम मुंबईच्या कर्णधारासाठी अजिबात चांगला गेला नाही. आतापर्यंत 10 डावात त्याच्या बॅटमधून केवळ 184 धावा झाल्या आहेत. त्याची सरासरी फक्त 18.4 आहे आणि स्ट्राइक रेट देखील 126 आहे. रोहितच्या बॅटमधून फक्त एक अर्धशतक झळकले आहे. या 10 डावांमध्ये रोहित पॉवरप्लेमध्ये 8 वेळा बाद झाला आहे. पॉवरप्लेमध्ये त्याने 127 च्या स्ट्राइक रेटने केवळ 138 धावा केल्या आहेत.