
गेल्या तीन मोसमाप्रमाणे या वेळीही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची कामगिरी चांगली आहे. रविवारी या संघाने राजस्थान रॉयल्सच्या बलाढ्य संघाचा त्यांच्या घरच्या मैदानावर पराभव केला. मात्र, या विजयादरम्यान मोहम्मद सिराजचा संयम सुटला. त्याने सहकारी खेळाडूला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. सामना संपल्यावर संघ जिंकला असला, तरी सिराजने आपल्या जोडीदाराची कॅमेऱ्यासमोर माफी मागितली.
IPL 2023 : मोहम्मद सिराजची आपल्याच संघातील खेळाडूला शिवीगाळ, मागावी लागली कॅमेऱ्यासमोर माफी
𝙍𝙞𝙜𝙝𝙩 𝙩𝙝𝙧𝙤𝙪𝙜𝙝 𝙩𝙝𝙚 𝙙𝙚𝙛𝙚𝙣𝙘𝙚 🔥🔥
An extraordinary delivery THAT 💪🏻@mdsirajofficial cleans up Jos Buttler and continues his habit of striking early for @RCBTweets!
#TATAIPL | #RCBvRR pic.twitter.com/YE4ge4tAU0
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2023
मोहम्मद सिराजने आपला ज्युनियर खेळाडू महिपाल लोमरोरची माफी मागितली. महिपाल लोमरोरने 19व्या षटकात एक खराब थ्रो फेकला. त्यानंतर सिराज स्टंपला धडकला. यानंतर सिराज चांगलाच संतापलेला दिसला आणि त्याने महिपालला शिवीगाळ केली. मात्र, नंतर सिराजला आपली चूक लक्षात आली आणि त्याने या खेळाडूची माफी मागितली.
त्यानंतर मोहम्मद सिराजने आरसीबीच्या व्हिडिओमध्ये सांगितले की, त्याने दोनदा महिपाल लोमरोरची माफी मागितली आहे. लोमरोर यानीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. या खेळाडूने सांगितले की, अशा मोठ्या सामन्यांमध्ये छोट्या गोष्टी घडत राहतात.
RCB v RR Game Day Post Match Interviews
Maxwell talks about his form, partnership with Faf, and what flipped the switch after the 10 over mark with the ball, while Mike Hesson, Adam Griffith and Harshal Patel explain the bowlers’ role in last night’s win.#PlayBold #ನಮ್ಮRCB pic.twitter.com/SAU4bYbSk2
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) April 24, 2023
दरम्यान सध्याच्या मोसमात मोहम्मद सिराज गोलंदाजी करत आहे. चिन्नास्वामीच्या पाटा विकेटवरही सिराजच्या गोलंदाजीची जादू चालली आहे. या उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने रविवारी राजस्थानचा सर्वोत्कृष्ट फलंदाज जोस बटलरला शून्यावर बाद केले. सिराजने या मोसमात 7 सामन्यात 13 विकेट घेतल्या असून पर्पल कॅप सध्या त्याच्या डोक्यावर आहे. सिराजचा इकॉनॉमी रेट फक्त 7.13 आहे जो प्रशंसनीय आहे.
आरसीबीचे 7 सामन्यांतून 8 गुण आहेत आणि ते गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्याला आता उर्वरित 7 साखळी सामन्यांमध्ये किमान 4 सामने जिंकावे लागतील आणि त्यासाठी सिराजला चांगली कामगिरी करणे आवश्यक आहे.
