IPL 2023: लोकांचे कपडे घुऊन पालनपोषण करणाऱ्या आईला मुलाने बनवले करोडपती


वाह रे पठ्ठ्या, या खेळाडूची कहाणी समोर आल्यावर तुम्हीही तेच म्हणाल. त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहे. त्याच्यासाठी त्याची आई हेच संपूर्ण जग आहे. त्याचे आयुष्य त्याच्या आईला समर्पित आहे. हे समर्पण कारण त्याने लहानपणी आईचा संघर्ष पाहिला आहे.

टिनच्या छपराखाली झोपून दुसऱ्यांच्या घरी कपडे धुवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारी आई पाहून एक दिवस हे सगळे बदलून टाकणारच, असा पवित्रा त्याने घेतला होता. तो त्याच्या आईची गरिबी दूर करेल. श्रीमंत होऊन दाखवेल आणि, आता ते स्वप्न खरोखरच सत्यात उतरले आहे.


आम्ही रोवमन पॉवेलबद्दल बोलत आहोत. तोच, ज्याला आयपीएल लिलावात 2.8 कोटी रुपयांची बोली लागली. गेल्या हंगामाच्या लिलावात रोवमन पॉवेलला दिल्ली कॅपिटल्सने विकत घेतले होते.

ईएसपीएनक्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत, वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटर इयान बिशपने रोवमन पॉवेलबद्दल सांगितले होते की, जेव्हा तो माध्यमिक शाळेत शिकत होता, तेव्हाच त्याने आपल्या आईची गरिबी दूर करण्याचे स्वप्न पाहिले होते. याबाबत त्याने आईला वचन दिले होते, जे तो अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण करत आहे.

रोवमन पॉवेल, जो दिल्ली कॅपिटल्सच्या मिडल ऑर्डरचा जीव बनला होता, त्याचा जन्म जमैकाच्या ओल्ड हार्बरच्या बेनिस्टर जिल्ह्यात झाला. कुटुंबात लहान बहिणीशिवाय एकटी आई आहे, कारण तिच्या जन्मापूर्वीच वडिलांनी तिला दत्तक घेण्यास नकार दिला होता. असे म्हणतात की ज्यांना वडिलांची सावली मिळते, ते खूप भाग्यवान असतात. पावेलला ते मिळाले नाही, पण अशी आई सापडली, जिने लाख अडचणींनंतरही हिम्मत हारली नाही.


रोवमन पॉवेल त्याच्या आईच्या धैर्याची प्रशंसा करतो. कॅरिबियन प्रीमियर लीगने या आई-मुलाच्या बाँडिंगवर एक डॉक्युमेंटरी तयार केली आहे, ज्याच्या क्लिपमध्ये पॉवेल त्याच्या आईबद्दल बोलताना दिसत आहे की त्याच्याकडे त्याच्या आईचे कौतुक करण्यासाठी शब्द कमी आहेत. माझे पोट भरले जावे, मला शाळेत जाता यावे म्हणून ती दुसऱ्यांच्या घरी कपडे कशी धुवायची ते मी पाहिले आहे.

या माहितीपटाच्या दुसऱ्या क्लिपमध्ये पावेलची आई सांगते की, आमच्या घराचे छत टिनाचे होते. पावसाळ्याच्या दिवसांत त्यातून पाणी टपकायचे. पण आम्हाला नीट झोप लागावी म्हणून पावेल जागा राहायचा आणि आमची काळजी घेत असे.


आई आणि मुलाच्या या कथेत खूप भावना असल्याचे स्पष्ट होते. मात्र, सध्या केकेआरविरुद्धच्या सामन्यात रोवमन पॉवेलला या भावनेची खूप गरज असेल. तो असेही म्हणतो की जेव्हा तो क्रिकेटच्या मैदानावर अडकतो, तेव्हा तो स्वत:ला खात्री देतो की तो जे काही करत आहे, ते त्याच्या आईसाठी करत आहे.

आयपीएल 2023 मध्ये आतापर्यंत झालेल्या 3 सामन्यांमध्ये त्याची बॅट अजिबात चालली नाही. त्याला केवळ 7 धावा करता आल्या. अशा परिस्थितीत जेव्हा त्याला केकेआरविरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळते, तेव्हा त्याने आईची आठवण करून काहीतरी मोठे केले, तर त्याचा फायदा त्यालाच नाही, तर दिल्ली कॅपिटल्सलाही होईल.