Watch Video : मुंबई इंडियन्सने तोडले लहानग्या चाहत्याचे हृदय, स्टेडियमच्या मधोमध रडला छोटा चाहता


घरच्या मैदानावर हरणे कोणत्याही संघासाठी खूप निराशाजनक असते. सनरायझर्स हैदराबादला मंगळवारी त्याच निराशेला सामोरे जावे लागले. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या IPL-2023 सामन्यात मुंबई इंडियन्सने यजमान हैदराबादचा 14 धावांनी पराभव केला. हा पराभव केवळ हैदराबादचाच नाही तर त्याच्या चाहत्यांचाही होता. हैदराबाद पराभवाकडे वाटचाल करत असताना एक छोटा चाहता अश्रू ढाळत होता.

या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी केली.त्यासाठी कॅमेरून ग्रीनने नाबाद 64 धावा केल्या. या खेळीच्या जोरावर मुंबईने 20 षटकांत 5 गडी गमावून 192 धावा केल्या. हैदराबादचा डाव 19.5 षटकांत 178 धावांत गुंडाळला.


हैदराबाद संघाने झुंज दिली, पण या संघाला विजय मिळवता आला नाही. या पराभवानंतर एका मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर या मुलाचे सनरायझर्स हैदराबादचा चाहता असल्याचे सांगितले जात आहे. या संघाच्या विकेट पडत राहिल्याने स्टँडवर बसलेल्या या संघाच्या चाहत्यांची निराशा होत होती. केवळ निराशच नाही तर प्रत्येक विकेटसोबत त्याचे अश्रू वाहत होते. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या मुलाच्या व्हिडिओमध्ये हा मुलगा रडताना दिसत आहे.

हैदराबादच्या या पराभवाने केवळ या मुलाचेच नाही, तर त्याच्या प्रत्येक चाहत्यांचे हृदय तुटले. चाहत्यांना त्यांच्या संघाबद्दल खूप उत्कटता असते. त्यांना त्यांचा संघ जिंकायचा असतो, पण जेव्हा ते घडत नाही, तेव्हा चाहते निराश होण्यात वेळ घालवत नाहीत. या सामन्यातही हैदराबादच्या चाहत्यांचे तेच झाले.

प्रत्येक वेळेप्रमाणे हा सामना पाहण्यासाठी हैदराबाद फ्रँचायझीची मालक काव्या मारन पोहोचली होती. पण संघ जिंकला नाही, तर तिलाही तोंडघशी पडलं. हैदराबादने हा सामना जिंकला असता, तर या संघाने विजयाची हॅट्ट्रिक साधली असती, पण तसे झाले नाही. हैदराबाद संघ सध्या गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर आहे.