एप्रिलचा महिना, समोर कोलकाता नाईट रायडर्सचा संघ आणि मुंबई इंडियन्सचा सचिन तेंडुलकर, जो आयपीएलमध्ये आपले पहिले षटक टाकण्याच्या तयारीत होता. सचिनने पहिल्याच षटकात 5 धावा दिल्या. संपूर्ण स्टेडियम दुमदुमले. सचिनचे आयपीएलचे पहिले षटक लोकांच्या हृदयात आणि मनात छाप पाडून गेले. लोकांनी त्याच्या पहिल्या षटकाचा फोटो, व्हिडिओ बराच काळ पाहिला, पण लाइव्ह अॅक्शन रिप्ले 14 वर्षांनंतर एप्रिल महिन्यात त्याच टीमविरुद्ध पाहायला मिळाला.
IPL 2023 : तोच महिना, तीच टीम, फक्त फरक 14 वर्षांचा, मुलगा अर्जुनने केली वडील सचिन तेंडुलकरची ‘कॉपी’
फरक इतकाच की 2009 मध्ये सचिन तेंडुलकर आक्रमणावर होता, तर 2023 मध्ये त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि पहिल्यांदा गोलंदाजी केली. हे देखील मनोरंजक आहे की अर्जुनने देखील त्याच्या वडिलांप्रमाणे मुंबई इंडियन्ससाठी पदार्पण केले आणि वडिलांप्रमाणेच केकेआरविरुद्ध पहिले षटक टाकले.
🎥 A special occasion 👏 👏
That moment when Arjun Tendulkar received his @mipaltan cap from @ImRo45 👍 👍
Follow the match ▶️ https://t.co/CcXVDhfzmi#TATAIPL | #MIvKKR pic.twitter.com/cmH6jMJRxg
— IndianPremierLeague (@IPL) April 16, 2023
अर्जुनने रविवारी KKR विरुद्ध आयपीएल पदार्पण केले आणि 2 षटके टाकली. त्यानेही वडिलांप्रमाणे पहिल्याच षटकात 5 धावा दिल्या. इतकंच नाही तर सचिन आणि अर्जुन या दोघांनीही पहिल्यांदा फक्त 2-2 षटके टाकली होती आणि दोन्ही वेळा मुंबईने विजय मिळवला होता. अर्जुनने 14 वर्षांनंतर प्रथमच आयपीएलमध्ये वडिलांच्या गोलंदाजीचे अॅक्शन रिप्ले दाखवले.
यासह इतिहासही रचला आहे. सचिन आणि अर्जुन तेंडुलकर ही आयपीएल खेळणारी पहिली पिता-पुत्र जोडी ठरली आहे. अर्जुनने पदार्पणाच्या सामन्यात 2 षटकात 17 धावा दिल्या. पदार्पणाच्या सामन्यात त्याला एकही विकेट मिळवता आली नाही. पदार्पणानंतर वडील सचिनने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली.
Arjun, today you have taken another important step in your journey as a cricketer. As your father, someone who loves you and is passionate about the game, I know you will continue to give the game the respect it deserves and the game will love you back. (1/2) pic.twitter.com/a0SVVW7EhT
— Sachin Tendulkar (@sachin_rt) April 16, 2023
सचिनने आपल्या मुलासाठी लिहिले की अर्जुन, एक क्रिकेटर म्हणून तू तुझ्या प्रवासात आणखी एक पाऊल पुढे टाकले आहेस. त्याने पुढे लिहिले की, एक वडील म्हणून त्याला या खेळाबद्दल खूप प्रेम आहे आणि खूप आवड आहे आणि मला माहित आहे की तो देखील खेळाचा आदर करत राहील. त्याने आपल्या मुलासाठी पुढे लिहिले की जर त्याने खेळाचा आदर केला, तर खेळ देखील प्रेम परत करेल. आपल्या मुलाला प्रोत्साहन देताना सचिनने लिहिले की, अर्जुनने इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत केली आहेस आणि तू यापुढेही मेहनत करत राहशील अशी आशा आहे.