Watch VIDEO : अक्षर पटेल कसा बनला टीम इंडियाचा ‘बापू’? जाणून घ्या त्यामागची गोष्ट


टीम इंडियासाठी रवींद्र जडेजा ‘जड्डू’ झाला, विराट कोहली ‘चिकू’ झाला आणि अक्षर पटेलला ‘बापू’ नाव मिळाले. जितके खेळाडू तितकी टोपणनावे. पण त्या सर्वांना नाव ठेवणारा एकच महेंद्रसिंग धोनी. होय, अक्षर पटेलने अखेर टीम इंडियाचा बापू होण्याचे रहस्य उघड केले आहे. आणि या नावामागील कारण एमएस धोनी असल्याचे सांगितले आहे.

आता धोनीने अक्षर पटेलचे नाव बापू का ठेवले हा प्रश्न आहे. आयपीएलच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये अक्षर पटेल स्वतः त्यामागची खरी कहाणी सांगत आहे.

अक्षर पटेलला बापू या नावामागचे कारण विचारले असता त्याने यामागे महेंद्रसिंग धोनी असल्याचे सांगितले. असे कसे विचारले असता त्याने सांगितले की, जेव्हा तो गोलंदाजी करायचा तेव्हा धोनीने त्याला विचारले की तुला काय नावाने हाक मारायची? अक्षर तर बोलता येणार नाही. पटेलही बोलता येणार नाही. मग काय बोलावे?


अक्षर पुढे म्हणाला, रवींद्र जडेजाही याच सामन्यात खेळत होता, ज्याला गुजरातमध्ये बापू म्हटले जात होते. त्यामुळे प्रत्येक गुजराती बापू आहे, असे माही भाईला वाटले. तिथूनच तो बापू म्हणू लागला. एकदा त्याने हाक मारली, मग बाकीच्या टीमनेही म्हणायला सुरुवात केली.

दरम्यान अक्षर पटेल सध्या आयपीएल 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत आहे. या हंगामात दिल्लीची स्थिती चांगली नाही. पहिले चार सामने गमावल्यानंतर ते गुणतालिकेत तळाशी आहेत. मात्र अक्षर पटेलला त्याची फिकीर नाही. या व्हिडिओमध्ये त्यांनी दिल्लीत परतण्याची आशा व्यक्त केली आहे. आयपीएल 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्स त्यांचा पुढील सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुशी खेळणार आहे. हा सामना बंगळुरूमध्ये खेळवला जाईल, जो या हंगामातील दिल्लीचा 5वा सामना असेल.