हा हत्ती खातो केळे सोलून, विश्वास बसत नसेल तर पहा व्हिडिओ


तुम्ही हत्तींना केळी खाताना पाहिले असेल. हा प्राणी कोणतेही फळ न सोलता गिळतो. पण बर्लिनच्या प्राणीसंग्रहालयातील एका हत्तीने आपल्या अनोख्या कौशल्याने लोकांची मने जिंकली आहेत. हा हत्ती नुसता केळी गिळत नाही, तर त्याला केळी सोलून खायला आवडतात. होय, तुम्ही अगदी बरोबर वाचले आहे. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे, जो पाहून लोकांच्या डोळ्यांवर विश्वास ठेवणे कठीण जात आहे.

करंट बायोलॉजी मासिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, या अनोख्या आशियाई हत्तीचे नाव पांग फा आहे, तो बर्लिन प्राणीसंग्रहालयात राहून केळी सोलायला शिकला आहे. जाड त्वचा काढण्यासाठी, पांग प्रथम केळीचे दोन भाग करतो. मग त्याचा गर बाहेर काढून खातो. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, पांग माणसाप्रमाणे केळी सोलून कसा खात आहे. याशिवाय, त्याला न आवडणारी केळी तो नाकारतो. आता हत्तीचा हा व्हिडीओ पाहून सगळेच थक्क झाले आहेत.

संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की आशियाई हत्ती पांग फक्त पिवळी केळी खातो. तो मानवी मुलांप्रमाणे तपकिरी केळी टाळत आहे. वृत्तानुसार, पांगला तपकिरी रंगाचे केळे देताच, त्याने त्वरित तपासणी केल्यानंतर ते फेकून दिले. Humboldt Universität zu Berlin मधील Bernstein Center for Computational Neuroscience चे मायकेल ब्रेक म्हणाले, आम्ही हत्तींमध्ये एक अतिशय अनोखी वागणूक शोधली आहे. ते म्हणाले, केळी सोलण्याची पांग फाची पद्धत अतिशय अनोखी आहे. यावरून त्याचे कौशल्य आणि बुद्धिमत्ता दिसून येते. आता या व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या गोष्टी बोलत आहेत. काहींना ते खूप गोंडस वाटले, तर बहुतेक जण हत्तीच्या बुद्धिमत्तेची प्रशंसा करत आहेत.