सध्या सर्वत्र रिंकू सिंगच्या नावाची चर्चा आहे. गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात काल झालेल्या आयपीएल सामन्यात रिंकूने सलग 5 षटकार ठोकून आपल्या संघाला म्हणजेच केकेआरला विजय मिळवून दिला. तेव्हापासून तो सर्वत्र चर्चेत आहे.
रिंकू सिंगच्या नावाचा जप करताना दिसला रणवीर सिंग, या बॉलीवूड स्टार्सवर 5 षटकारांची जादू, जाणून घ्या कोण काय म्हणाले?
रिंकू सिंगच्या या शानदार खेळीचे सर्वजण कौतुक करत आहेत. त्याचबरोबर बॉलिवूड स्टार्सही त्याचे कौतुक करण्यात मागे नाहीत. रिंकूच्या या धडाकेबाज खेळीवर अनेक सिनेतारकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया दिल्या असून क्रिकेटरचे जोरदार कौतुक केले आहे. जाणून ध्या कोण काय म्हणाले ते.
RINKU !!!!!!!!! RINKU !!!!!!! RINKU !!!!!!! RINKU !!!!!!!!!!!!!!! Yeh kya tha !?!?!?! 🤯🤯🤯🤯🤯🤯🤯🤯🤯🤯🤯🤯🤯🤯 #IPLonStar #GTvsKKR @KKRiders #rinkusingh @StarSportsIndia 🏏
— Ranveer Singh (@RanveerOfficial) April 9, 2023
रिंकू सिंगची ही दमदार खेळी पाहून बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग थक्क झाला. त्याने ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली. त्याने लिहिले, “रिंकू…रिंकू…रिंकू, काय होते हे?”
Last Over Change 🔥@rinkusingh235 – 48 (21)* #RinkuSingh #Rinku #KKRvsGT #GTvsKKR #IPL2023pic.twitter.com/tBzkZAnMNa
— ❤️Sathya Priya❤️ (@SathyaPriya_Off) April 10, 2023
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानने रिंकू सिंगची पोस्ट शेअर करत त्याला बीस्ट म्हटले आहे. त्याचवेळी सुहानाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर त्याचे पोस्टरही शेअर केले आहे.
बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. त्याने लिहिले, “ओएमजी, रिंकू सिंगचे सलग पाच षटकार. किती मोठा पाठलाग. यापूर्वी असे काहीही पाहिले नाही. तसेच त्याने केकेआरचे अभिनंदन केले.
Omg KKR #RikuSingh 5 sixes in a row. What a chase incredible, never seen anything like this. Absolutely exhilarating. Congratulations #KKR #Hattrick #IPL2023 #insanity #chase200plus
— arjun rampal (@rampalarjun) April 9, 2023
विशेष म्हणजे शाहरुख खान केकेआर संघाचा मालक आहे. दुसरीकडे, या सामन्यात रिंकू सिंगने शानदार प्रदर्शन केल्यावर शाहरुखच्या आनंदाला सीमा राहिली नाही. या सर्व स्टार्ससोबत किंग खानने आपला आनंद पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने व्यक्त केला.
JHOOME JO RINKUUUUU !!! My baby @rinkusingh235 And @NitishRana_27 & @venkateshiyer you beauties!!! And remember Believe that’s all. Congratulations @KKRiders and @VenkyMysore take care of your heart sir! pic.twitter.com/XBVq85FD09
— Shah Rukh Khan (@iamsrk) April 9, 2023
शाहरुखने रिंकूचा डिझाईन केलेला फोटो त्याच्या नुकत्याच रिलीज झालेल्या पठाण चित्रपटाच्या पोस्टरच्या रूपात शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले होते, “झूमे जो रिंकू. माझे बाळ रिंकू सिंग.” यासोबतच त्याने नितीश राणा आणि व्यंकटेश अय्यर यांना देखील मेंशन केले आणि सर्वांना हुशार म्हणत त्यांचे अभिनंदन केले.