कोलकाता नाईट रायडर्सने IPL-2023 मध्ये पहिला विजय मिळवला आहे. त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुविरुद्ध त्यांच्या घरच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर हा विजय मिळवला. कोलकाताने बंगळुरूचा त्यांच्या घरच्या मैदानावर 81 धावांनी पराभव केला. या सामन्यात बंगळुरूचे फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. ना कर्णधार फाफ डु प्लेसिसची बॅट चालली ना विराट कोहलीची. विराट कोहलीच्या फूटवर्कने फलंदाजीत काम केले नसेल, पण KKR मालक शाहरुख खानसोबतच्या त्याच्या फूटवर्कने खळबळ उडवून दिली आहे.
IPL 2023 : शाहरुख खानसाठी विराट कोहलीला दिसले नाही दुखणे, एका आवाजावर पूर्ण केली मागणी, पाहा व्हिडिओ
या सामन्यात कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना सात गडी गमावून 204 धावा केल्या. बंगळुरूचा संघ 17.4 षटकांत 123 धावांत गारद झाला. या सामन्यानंतर दोन्ही संघातील खेळाडूंची जुगलबंदी पाहायला मिळाली असली, तरी कोहली आणि शाहरुखच्या जोडीने जे काम केले ते इतर कोणी करू शकले नाही.
#ViratKohli #KKRvsRCB #KKRvRCB
Shahrukh Khan meets Virat Kohli.Two of the best from India! and both of them shaking legs for jhoome jho pathaan pic.twitter.com/PJncZL9tUK
— 👌⭐👑 (@superking1815) April 6, 2023
सामना संपल्यावर दोन्ही संघाचे खेळाडू एकमेकांशी बोलत होते. यादरम्यान कोलकाता संघाचा मालक शाहरुख खान आला आणि त्याने कोहलीची भेट घेतली. कोहलीला पाहताच शाहरुखने धावत जाऊन त्याला मिठी मारली. त्यानंतर दोघेही काही वेळ बोलले. या सामन्यात कोहलीच्या पायाला दुखापत झाली होती. शाहरुखने कदाचित याच दुखापतीबद्दल विचारले. कोहली जेव्हा शाहरुखला भेटला, तेव्हा भारतीय फलंदाजाच्या पायाला पट्टी बांधण्यात आली होती. त्यानंतर शाहरुखने कोहलीला त्याच्या अलीकडच्या पठाण चित्रपटातील टायटल गाण्यावर स्टेप करण्यास सांगितले.
कोहलीने हळूहळू ही स्टेप केली. कोहलीने एक-दोनदा पाय उचलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कोहली आणि शाहरुख हसायला लागले. दोघेही काही वेळ बोलले. कोहली आणि शाहरुखच्या जोडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
IPL-2023 च्या पहिल्या सामन्यात कोहलीने शानदार फलंदाजी केली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आपला पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळला. या सामन्यात बंगळुरूला विजय मिळाला. या सामन्यात कोहलीची बॅट खूप मजबूत होती. त्याने मुंबईविरुद्ध नाबाद 82 धावांची खेळी केली. पण दुसऱ्या सामन्यात कोहलीची बॅट चालली नाही. त्याने 18 चेंडूंचा सामना केला आणि तीन चौकारांच्या मदतीने 21 धावा केल्या. आगामी सामन्यांमध्ये कोहली संघासाठी सर्वोत्तम खेळी खेळेल, अशी आशा बेंगळुरूला असेल.