IPL 2023 : धोनीने 2 चेंडूत वाजवले लखनौचे ’12’, स्टाईलने पूर्ण केल्या 5000 धावा, पाहा व्हिडिओ


ज्या आशेने चेन्नई सुपर किंग्जचे चाहते सोमवारी चेपॉक स्टेडियमवर पोहोचले, ती इच्छा पूर्ण झाली. चेन्नईच्या चाहत्यांना त्यांचा आवडता क्रिकेटर महेंद्रसिंग धोनीचे धगधगते रूप पहायला मिळाले. धोनीने चाहत्यांना निराश केले नाही. 2019 नंतर चेन्नईचा संघ प्रथमच घरच्या मैदानावर खेळत होता. अशा परिस्थितीत थला हे प्रसिद्ध नाव चाहत्यांसाठी काहीतरी करेल, ज्यामुळे सर्व उणीवा भरून निघतील, अशी अपेक्षा होती. फक्त धोनीच नाही, तर चेन्नईच्या बाकीच्या फलंदाजांनीही चाहत्यांचे जोरदार मनोरंजन केले.

एमएस धोनी टॉसला आला, तेव्हा संपूर्ण स्टेडियम जल्लोषात होते. नाणेफेकीच्या वेळी जेव्हा धोनीला चेपॉकमध्ये परतण्याबद्दल विचारण्यात आले, तेव्हा तो भावूक झाला आणि म्हणाला की या पुनरागमनाचा अर्थ खूप आहे.


चेन्नईच्या डावातील शेवटच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर धोनी फलंदाजीला आला. येताच त्याने ते काम केले, ज्यासाठी त्याचे नाव प्रसिद्ध आहे. त्याने लखनौचा झंझावाती वेगवान गोलंदाज मार्क वुडच्या चेंडूवर थर्ड मॅनला षटकार ठोकला. पुढच्या चेंडूवर, वुडने ऑफ-स्टंपच्या बाहेर एक बाउन्सर टाकला, जो धोनीने खेचला आणि त्याच्या बॅटच्या मध्यभागी घेऊन डीप मिड-विकेटवर षटकार मारला. हा षटकार 89 मीटरचा होता. धोनीने दोन षटकार मारले, संपूर्ण स्टेडियम त्याच्यासाठी उभे राहिले. धोनी फलंदाजीला आला, तेव्हा हा वेग अपेक्षित होता आणि त्याने तो संघाला दिला. ओव्हरच्या चौथ्या चेंडूवरही धोनीला वुडवर मोठा फटका मारायचा होता, पण यावेळी त्याने पॉइंटवर उभ्या असलेल्या रवी बिश्नोईच्या हातात चेंडू खेळला. धोनीने 3 चेंडूंचा सामना करत 12 धावा केल्या. यासह धोनीने आयपीएलमधील 5000 धावा पूर्ण केल्या आहेत.

धोनीच्या आधी चेन्नईच्या ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली आणि पहिल्या विकेटसाठी 110 धावांची भागीदारी केली. गायकवाडने 31 चेंडूत तीन चौकार आणि चार षटकार मारले. कॉनवेचे अर्धशतक हुकले. त्याने 29 चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकार मारले. शिवम दुबेने 16 चेंडूत 27 धावा केल्या. अंबाती रायडूने नाबाद २७ धावा केल्या.