खेळायला आला होता IPL पण आता चालता येत नाही, समोर आला चॅम्पियन खेळाडूचा वेदनादायक व्हिडिओ


ते म्हणतात, आयुष्यात कधी काय होईल, काही सांगता येत नाही आणि, याचे ताजे उदाहरण म्हणजे केन विल्यमसन. न्यूझीलंडचा केन आयपीएल 2023 खेळण्यासाठी भारतात आला होता, परंतु पहिल्याच सामन्यात त्याच्यासोबत अशी घटना घडली, जी प्रत्येक खेळाडूला टाळायची असते. गुजरात टायटन्सकडून खेळताना केन विल्यमसनला आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात गंभीर दुखापत झाली होती, त्यामुळे त्याला संपूर्ण स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले आहे.

आता प्रश्न असा आहे की त्याच्या दुखापतीचे ताजे अपडेट काय? त्यामुळे याबाबतचा जो व्हिडिओ समोर आला आहे, तो धक्कादायक आहे. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये केन विल्यमसन क्रॅचच्या साहाय्याने चालताना दिसत आहे, ज्यावरून त्याची दुखापत किती गंभीर आहे, हे दिसून येते.


IPL 2023 च्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना केन विल्यमसनला गुडघ्याला दुखापत झाली. या दुखापतीमुळे त्याला बीसीसीआय लीगमधून बाहेर व्हावे लागले. टूर्नामेंटमधून बाहेर पडल्यानंतर विल्यमसन आता त्याच्या घरी पोहोचला आहे, जिथून त्याचे क्रॅचच्या मदतीने चालतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

भारतातून न्यूझीलंडला रवाना होण्यापूर्वी केन विल्यमसनने त्याला शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे आभारही मानले. तसेच गुजरात टायटन्सच्या विजयासाठी शुभेच्छा दिल्या. केन विल्यमसन चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्सच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग होता, परंतु दुखापतीमुळे त्याने फलंदाजी केली नाही. त्याच्या जागी गुजरातने इम्पॅक्ट प्लेअर म्हणून साई सुदर्शनला मैदानात उतरवले.