महेंद्रसिंग धोनीला ‘बिग डॉग’ म्हणण्यावरून गोंधळ, CSK च्या व्हिडिओवर सहकारी खेळाडूने हे काय म्हटले?


एमएस धोनी सध्या चेन्नईमध्ये आयपीएल 2023 साठी तयारी करत आहे. त्याची तयारी पाहण्यासाठी संपूर्ण स्टेडियम चाहत्यांनी भरले आहे. चेन्नई सुपर किंग्सने आदल्या दिवशी त्याचा एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये तो चाहत्यांनी भरलेल्या स्टेडियममध्ये फलंदाजीचा सराव करण्यासाठी मैदानावर जाताना दिसत आहे. धोनीच्या या व्हिडीओवर त्याच्या माजी सहकाऱ्याने त्याला बिग डॉग म्हटले, ज्यामुळे एकच गोंधळ उडाला. धोनी मैदानावर येताच संपूर्ण स्टेडियम त्याच्या नावाचा जयघोष करु लागले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वाधिक व्हायरल होत आहे.


चेन्नई सुपर किंग्जकडून आयपीएल खेळणारा स्कॉट स्टायरिस धोनीबद्दलची लोकांची क्रेझ पाहून स्वत:ला रोखू शकला नाही. त्याने CSK चा व्हिडिओ रिट्विट करून कमेंट केली. त्याने धोनीसाठी स्टिल द बिग डॉग अराउंड टाउन असे लिहिले.


स्टायरिसला असे म्हणायचे होते की धोनी अजूनही चेन्नईतील सर्वात शक्तिशाली आणि सर्वात महत्वाची व्यक्ती आहे, परंतु चाहत्यांनी त्याच्या टिप्पणीचा गैरसमज केला आणि धोनीसाठी ‘बिग डॉग’ वापरल्यामुळे संतापले. युजर्स म्हणतात की धोनीसाठी कोणी असा शब्द कसा काय वापरू शकतो.

काही लोकांनी गैरसमज दूर करण्याचाही प्रयत्न केला, पण स्टायरिसच्या कमेंटवर गोंधळ घालणाऱ्यांची संख्या जास्त आहे. चेन्नई सुपर किंग्जबद्दल बोलायचे झाले तर, संघ 31 मार्च रोजी अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध आयपीएल 2023 चा सलामीचा सामना खेळणार आहे.