लाइव्ह मॅचमध्ये मुलांना वाचवण्यासाठी खेळाडूने धोक्यात टाकला स्वतःचा जीव, एक चूकीमुळे झाले असते 2.8 कोटींचे नुकसान


रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिज क्रिकेट संघाला पराभवाचा सामना करावा लागला. विंडीज संघाने मोठी धावसंख्या करूनही हा सामना गमावला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने पाच गडी गमावून 258 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने सात चेंडूंपूर्वी हे लक्ष्य गाठून विश्वविक्रम केला. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये पाठलाग करताना हा सर्वात मोठा विजय आहे. अर्थात, विंडीजचा पराभव झाला असेल, पण या सामन्यात या संघाचा कर्णधार रोव्हमन पॉवेलने हृदय जिंकणारी कामगिरी केली.

पॉवेलने या सामन्यात 19 चेंडूंचा सामना करत 28 धावा केल्या. यादरम्यान त्याने आपल्या बॅटने दोन षटकार आणि एक चौकार लगावला. पॉवेल इंडियन प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतो. दिल्लीने या खेळाडूला 2.80 कोटी रुपये दिले होते. आयपीएल-2023 मध्ये, दिल्लीला पॉवेलकडून त्याचा झंझावाती अवतार दाखवण्याची अपेक्षा असेल.


सुपरस्पोर्ट पार्कवर वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना सुरू होता. दक्षिण आफ्रिकेचा संघ लक्ष्याचा पाठलाग करत होता. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाने फटका मारला आणि चेंडू सीमारेषेकडे गेला. पॉवेल चेंडू रोखण्यासाठी मागे धावला. चेंडू जिथे जात होता, तिथे दोन बॉल बॉय सीमारेषेवर उभे होते. त्यातील एक खूपच लहान होता आणि त्याचे वय साधारण 4-5 वर्ष असेल. चेंडू सीमारेषेजवळ जात असताना बॉल बॉय चेंडू उचलण्यासाठी सीमारेषेवर आला, अशा स्थितीत पॉवेल त्या मुलावर पडेल की काय अशी भीती होती, पण या खेळाडूने त्या मुलाला वाचवले आणि तो स्वत: सीमेवर गेला. इतकंच नाही तर तो याच्याही पुढे गेला. तो बोर्ड आणि त्याच्या मागे असलेल्या पाईपमध्ये लटकला. मात्र, पॉवेलने कसा तरी जीव धोक्यात घालून लहान मुलाला आणि त्याच्या मागे बसलेल्या दुसऱ्या बॉल बॉयला वाचवण्यात यश मिळविले.

दरम्यान या सामन्यात दोन्ही संघाच्या फलंदाजांनी जोरदार पाऊस पाडला. जॉन्सन चार्ल्सने वेस्ट इंडिजसाठी झंझावाती शतक झळकावले. त्याने 39 चेंडूत आपले शतक पूर्ण केले आणि यासह तो वेस्ट इंडिजसाठी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज ठरला. त्याने 46 चेंडूंचा सामना केला आणि 10 चौकार आणि 11 षटकार मारले. 118 धावा केल्या. त्याचे शतक मात्र संघाला विजय मिळवून देऊ शकले नाही, कारण क्विंटन डिकॉकने 44 चेंडूत 100 धावा करून दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून दिला. यामध्ये रीझा हेंड्रिक्सने त्याला चांगली साथ दिली. त्याने 28 चेंडूत 68 धावा केल्या.