Video : गळ्यात लाल दुपट्टा, बायकोसोबत डान्स, मेव्हण्याच्या लग्नात दाजी रोहितचा जबरदस्त डान्स


रोहित शर्मा सध्या त्याच्या मेव्हण्याच्या लग्नात व्यस्त आहे. मेव्हणा कुणाल सजदेहच्या लग्नामुळे त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातून सुट्टी घेतली. आता कुणालच्या संगीत सोहळ्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रोहित पूर्णपणे वेगळ्या अंदाजात दिसत आहे. काळ्या कुर्ता पायजमासह गळ्यात लाल दुपट्टा घालून पत्नी रितिकासोबत भारतीय कर्णधाराने जबरदस्त डान्स केला.


मेव्हण्याच्या लग्नात रोहितने पत्नी रितिकासोबत स्टेजवर जबरदस्त डान्स केला. यादरम्यान या जोडप्याची अप्रतिम जुगलबंदीही पाहायला मिळाली. कुणालच्या लग्नात रोहित मस्ती करण्याची एकही संधी सोडत नाहीये. इतकंच नाही तर मुलींच्या गँगच्या फोटोशूटदरम्यानही त्याने खास एन्ट्री केली होती, ज्याचा फोटो रितिकाने शेअर केला होता.

रितिका तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून प्रत्येक क्षणाचे फोटो शेअर करत असते. ज्यामध्ये रोहित पूर्ण मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. 19 मार्च रोजी खेळल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये रोहित भारतीय संघात परतणार आहे. यापूर्वी, रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2-1 ने जिंकली होती.