IPL 2023आधी धोनी बनला रॉकस्टार, चाहर-गायकवाडने गिटारच्या तालावर केला नाच, पाहा व्हिडिओ


इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) पुढील हंगाम 31 मार्चपासून सुरू होत आहे. महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा या लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. धोनी चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करताना दिसणार आहे. धोनीने लीगमध्ये खेळण्याची तयारी सुरू केली आहे. पण त्याआधी तो रॉकस्टारच्या स्टाइलमध्ये दिसला आहे. तेही चेन्नई सुपर किंग्जच्या जर्सीत. तो एकटा नाही. त्याच्यासोबत अनेक खेळाडूही डान्स करत आहेत.

चेन्नई सुपर किंग्जचा संघ आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. या संघाला चार वेळा हे विजेतेपद पटकावण्यात यश आले आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली संघाने हे चारही जेतेपद पटकावले आहे. आता चेन्नई पाचवे जेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करेल. चेन्नईने 2010. 2011, 2017 आणि 2021 मध्ये IPL ट्रॉफी जिंकली.


धोनीची फ्रँचायझी चेन्नईने आपल्या ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये धोनी रॉकस्टार स्टाईलमध्ये दिसत आहे. धोनीच्या हातात गिटार आहे आणि तो गिटार वाजवत आहे. या व्हिडिओमध्ये धोनीसोबत ऋतुराज गायकवाड आहे. त्याच्याशिवाय शिवम दुबे आणि दीपक चहरही या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. हे सर्व लोक नाचताना आणि मस्ती करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ एखाद्या जाहिरातीच्या किंवा प्रोमोच्या शूटिंगदरम्यानचा आहे.

धोनी आयपीएलच्या सुरुवातीपासून म्हणजेच 2008 पासून चेन्नई सुपर किंग्जसोबत आहे. हे आयपीएल त्याचे शेवटचे आयपीएल असू शकते. धोनीने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता पण तो आयपीएल खेळत होता. गेल्या मोसमात जेव्हा धोनीला आयपीएलमधून निवृत्तीबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने चेन्नईमध्ये न खेळता आयपीएलला अलविदा म्हणणे चेन्नईच्या चाहत्यांवर अन्याय होईल असे म्हटले होते. अशा स्थितीत धोनीची ही शेवटची आयपीएल असू शकते, असा अंदाज लावला जाऊ शकतो.