पायाला गंभीर दुखापत असूनही कुबड्यांसह स्विमिंगपुलमध्ये उतरला ऋषभ पंत, लवकरच परतण्यासाठी उचलले मोठे पाऊल


भारतीय संघाचा स्टार खेळाडू ऋषभ पंत सध्या दुखापतीतून सावरत आहे. गेल्या वर्षी 30 डिसेंबरला पंत यांचा कार अपघात झाला होता. याच कारणामुळे तो बऱ्याच दिवसांपासून क्रिकेटपासून दूर होता. पंत सध्या त्याच्या रिकव्हरीवर लक्ष केंद्रित करत आहे. तो सतत बरा होण्याचा प्रयत्न करत आहे. काही दिवसांपूर्वी पंतने कुबड्यांच्या साहाय्याने चालतानाचे काही फोटो पोस्ट केले होते, आता पंतने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये पंतची प्रकृती हळूहळू सुधारत असल्याचे दिसून येते.
Rishabh Pant steps into swimming pool with crutches despite serious leg injury, big step to return soon
नववर्षानिमित्त पंत दिल्लीहून आपल्या घरी जात असताना त्यांची भरधाव कार दिल्ली-डेहराडून महामार्गावरील दुभाजकावर चढून उलटली. या अपघातात पंतला खूप दुखापत झाली होती. पण सर्वात मोठी दुखापत त्याच्या अस्थिबंधनाची होती, त्यासाठी त्याच्यावर शस्त्रक्रियाही झाली. आता तो त्यातून सावरण्याच्या प्रक्रियेत आहे.

पंतने नुकत्याच पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये तो स्विमिंग पूलमध्ये आहे. एका हातात कुबडी घेऊन तो तलावात हळू चालत आहे. या व्हिडीओसोबत पंतने कॅप्शन लिहिले की, छोट्या गोष्टी, मोठ्या गोष्टी आणि त्यादरम्यान मला जे मिळाले त्याबद्दल कृतज्ञ. पंतने त्याच्या इन्स्टास्टोरीवर पूलमध्ये चालतानाचा फोटोही टाकला आहे आणि लिहिले आहे, एका वेळी एकच पाऊल.

हा पंतच्या पुनरागमन प्रक्रियेचा एक भाग असू शकतो. पंतला चालताना त्रास होत आहे, त्यामुळे त्याच्या पायांची हालचाल वाढवण्यासाठी हा व्यायाम असू शकतो.