
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा चौथा आणि शेवटचा कसोटी सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादमध्ये खेळला जात आहे. सामन्याचा शेवटचा दिवस सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाने न्यूझीलंडचा विजय साजरा केला. विराट कोहलीने संघाला मिठी मारली. खरेतर, क्राइस्टचर्च येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा 2 विकेट्सने पराभव केला होता. किवी संघाच्या या विजयासह भारताने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.
Video : अहमदाबादमध्ये न्यूझीलंडचा विजय साजरा करताना विराट कोहलीने मारली सर्वांना मिठी
5व्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी भारताला ही आनंदाची बातमी मिळाली. अशा परिस्थितीत जेव्हा संघ मैदानावर उतरला, तेव्हा सर्वांनी हात जोडून अंतिम फेरी गाठल्याचा आनंद साजरा केला. ज्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. खरं तर, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीत भारतासोबत श्रीलंकेचा संघही होता.
अंतिम तिकीट मिळविण्यासाठी भारताला अहमदाबाद कसोटी जिंकणे आवश्यक होते. दुसरीकडे, श्रीलंकेने दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये न्यूझीलंडचा पराभव केला असता, तर अहमदाबाद कसोटी अनिर्णित राहिल्यास भारत अंतिम शर्यतीतून बाहेर पडला असता आणि श्रीलंकेचा संघ अंतिम फेरीत दाखल झाला असता, पण न्यूझीलंडने पहिल्या कसोटीत श्रीलंकेला पराभूत करून त्यांचे स्वप्न भंग केले आणि भारताचा मार्ग मोकळा केला.
न्यूझीलंड 2 विकेट्सने जिंकला. श्रीलंकेने यजमानांना 285 धावांचे लक्ष्य दिले होते, जे किवी संघाने 8 गडी गमावून पूर्ण केले. या विजयाचा हिरो ठरला डॅरेल मिशेल, ज्याने पहिल्या डावात 102 धावा आणि दुसऱ्या डावात 81 धावा केल्या. दुसरीकडे, भारताने चौथ्या दिवशी पहिल्या डावात 91 धावांची आघाडी घेतली होती. विराट कोहलीने 186 धावांची खेळी केली. पण त्याचे द्विशतक हुकले.
