भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ चौथ्या कसोटी सामन्यासाठी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आमनेसामने आहेत. या सामन्याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज देखील उपस्थित होते. सामन्याच्या पहिल्या दिवसाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो प्रेक्षकांच्या घोषणाबाजीचा आहे. खरे तर सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय खेळाडू सीमारेषेजवळ उभे होते, तेव्हा कॅमेऱ्याची नजर मोहम्मद शमीवर पडली.
IND vs AUS: मोहम्मद शमीला पाहताच सुरु झाली ‘जय श्री राम’ची घोषणाबाजी, सूर्यानेही हात जोडले, व्हिडिओ
शमीला पाहताच काही प्रेक्षकांनी जय श्री रामच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. शमीने प्रेक्षकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. प्रेक्षकांच्या या वागण्यावर सोशल मीडियावरही टीका होत आहे. खरंतर चाहते आधी सूर्याचा जयघोष करत होते. भारतीय फलंदाजानेही त्याला हात जोडून अभिवादन केले, मात्र शमीला पाहून प्रेक्षकांचा सूर बदलला.
खेल में भी धर्म को घुसा दिया।
"शामी जय श्री राम…" के नारे,मोटेरा स्टेडियम में।
किस दिशा में धकेला जा रहा है,देश? pic.twitter.com/7bwEr7XNLN
— Surya Pratap Singh IAS Rtd. (@suryapsingh_IAS) March 12, 2023
एवढेच नाही तर एका व्यक्तीने शमीला घेरले आणि घोषणाबाजी करण्यास सांगितले. टी-20 वर्ल्ड कपमध्येही शमीवर हल्ला झाला होता. खरं तर, टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने भारताचा 10 विकेट्सने पराभव केला होता, त्यानंतर शमी ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला होता. त्यानंतर सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण, अगदी पाकिस्तानी फलंदाज मोहम्मद रिझवानने शमीला पाठिंबा दिला होता.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, मोहम्मद शमीने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात 2 विकेट घेतल्या. त्याने मार्नस लॅबुशेन आणि पीटर हँड्सकॉम्ब यांची शिकार केली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 480 धावा केल्या, त्यानंतर भारताने पहिल्या डावात 571 धावा करत 91 धावांची आघाडी घेतली. अखेरच्या दिवशी चहापानाच्या ब्रेकपर्यंत ऑस्ट्रेलियाने 2 बाद 158 धावा केल्या होत्या.