शुभमन गिलने अहमदाबाद कसोटीत दमदार शतक झळकावत ऑस्ट्रेलियाचे चक्रव्यूह मोडले आहे. त्याचे कसोटी क्रिकेटमधील हे दुसरे शतक आहे. इतकेच नाही तर अहमदाबादच्या या मैदानावर त्याचे 39 दिवसांतील हे दुसरे शतक आहे. गेल्या महिन्यात याच मैदानावर त्याने न्यूझीलंडविरुद्ध टी-20मध्ये शतक झळकावले होते. अहमदाबादमध्ये गिल आणि चेतेश्वर पुजारा ही जोडी फोडण्यासाठी ऑस्ट्रेलियाने चक्रव्यूह निर्माण केले. दोघांनाही ऑस्ट्रेलियाने बराच वेळ फसवण्याचे प्रयत्न केले.
शुभमन गिलने तोडले ऑस्ट्रेलियाचे ‘चक्रव्यूह’, झळकावले कारकिर्दीतील दुसरे कसोटी शतक
स्टीव्ह स्मिथने क्षेत्ररक्षण अशाप्रकारे सजवले की भारताला एकही चौकार मारणे कठीण झाले होते. एकेरीच्या मदतीने गिलने 73 वरून 80 धावांपर्यंत मजल मारली. 80 धावांपर्यंत पोहोचताच त्याचा दृष्टिकोन बदलला आणि ग्रीनच्या ओव्हरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर त्याने सलग 2 चौकार मारले. 96 चेंडूंनंतर पहिला चौकार भारतीय छावणीतून बाहेर पडला.
CENTURY for @ShubmanGill 👏👏
A brilliant 💯 for #TeamIndia opener. His 2nd in Test cricket.#INDvAUS pic.twitter.com/shU2nuWLWo
— BCCI (@BCCI) March 11, 2023
गिलने 2 चौकारांसह 88 धावांपर्यंत मजल मारली. यानंतर पुजाराही थोडा आक्रमक मूडमध्ये दिसला. गिलने 61व्या षटकात नॅथन लायननच्या डोक्यावरुन चौकार मारून 96 धावांपर्यंत मजल मारली. गिलनेही चौकार मारून शतक पूर्ण केले. 62व्या षटकात मर्फीच्या दुसऱ्या चेंडूवर शॉर्ट फाईनवर त्याने दमदार शॉट खेळला.
नॅथन लायननेही डायव्हिंग करून गिलचा फटका रोखण्याचा प्रयत्न केला, पण गिल आणि त्याचा फटका रोखू शकला नाही. यासह त्याने 194 चेंडूत शतक पूर्ण केले. विराट कोहलीनेही त्याच्या शतकाचा आनंद साजरा केला. यादरम्यान गिलने 10 चौकार आणि 1 षटकार मारला. एकाच वर्षात तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा शुभमन गिल हा चौथा भारतीय ठरला आहे. त्याच्या आधी रोहित शर्मा, सुरेश रैना आणि केएल राहुल यांनी ही कामगिरी केली आहे.