हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने महिला प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्सला पहिल्या पराभवाची चव चाखायला लावली. मुंबईने दिल्लीचा 8 गडी राखून पराभव करत विजयाची हॅट्ट्रिक केली. या सामन्यानंतरही दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंग आणि मुंबईची अज्ञात खेळाडू सायका इसाक यांचे ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपवर वर्चस्व आहे.
WPL 2023 : DC कॅप्टन आणि MIच्या अनोळखी खेळाडूचे वर्चस्व, जाणून घ्या कोणाकडे आहे ऑरेंज आणि पर्पल कॅप?
लॅनिंगने मुंबईविरुद्ध 41 चेंडूत 43 धावा फटकावल्या. यासह तिने या लीगमधील 3 सामन्यात एकूण 185 धावा केल्या आहेत. यादरम्यान तिने 2 अर्धशतके झळकावली. लॅनिंग ही लीगमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे. म्हणजे डोक्यावर ऑरेंज कॅप चमकत आहे.
लॅनिंगची मुंबईच्या हेली मॅथ्यूजशी स्पर्धा आहे. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत मॅथ्यूज 156 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तथापि, लेनिंगने हा फरक आणखी वाढवला आहे.
मुंबईच्या सायका इसाकच्या डोक्यावर पर्पल कॅप चमकत आहे. लीगच्या पहिल्या दिवसापासून सायकाकडे कॅप आहे. तिने 3 सामन्यात 9 विकेट्स घेतल्या आहेत. तिने दोनदा एका सामन्यात 3 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत.
मात्र, सायकालाही मॅथ्यूजचे आव्हान आहे. पर्पल कॅपच्या शर्यतीत मॅथ्यूज 6 विकेटसह दुसऱ्या स्थानावर आहे.