होळीच्या दिवशी टीम इंडियाच्या खेळाडूला मिळाली गोड बातमी, दुस-यांदा झाला बापमाणूस


टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवसाठी होळीचा दिवस खूप खास होता. 8 मार्च ही तारीख उमेश यादव कधीच विसरू शकणार नाही, कारण टीम इंडियाचा हा खेळाडू या दिवशी दुसऱ्यांदा बाप झाला आहे.

उमेश यादवची पत्नी तान्या हिने मुलीला जन्म दिला आहे. उमेश यादवने सोशल मीडिया पोस्टद्वारे क्रिकेट चाहत्यांना ही माहिती दिली. नुकतेच उमेश यादवला त्याच्या वडिलांच्या निधनाने दुःख झाले होते, मात्र आता त्याच्या घरी एक छोटी परी आली आहे.

उमेश यादव आणि तान्या यांचा विवाह 2013 साली झाला होता. उमेश 2021 मध्ये वडीलही झाला. त्यांच्या घरी एक छोटी परी आली होती आणि पुन्हा एकदा त्यांच्या घरी मुलगी झाली.

उमेश यादवच्या आधी टीम इंडियाच्या अनेक स्टार खेळाडूंच्या घरी मुलीचा जन्म झाला होता. विराट कोहली, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा या सर्वांना मुली झाल्या होत्या. आता या यादीत उमेश यादवही सामील झाला आहे.

उमेश यादवबद्दल सांगायचे तर या खेळाडूने इंदूर कसोटीत टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवले. यादवने पहिल्या डावात 3 बळी घेत भारतीय संघाला पुनरागमन करून दिले. मात्र, अखेर हा सामना ऑस्ट्रेलियानेच जिंकला.