VIDEO : शार्दुल ठाकूरने श्रेयस अय्यरच्या गाण्यावर धरला ठेका, भावी पत्नीसोबत केला खूप डान्स


टीम इंडियाचा आणखी एक बॅचलर आज विवाहबंधनात अडकणार आहे. आज भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरचा विवाह आहे. विधी सुरू झाले आहेत. काही विधींचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यातील एक व्हिडिओ, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे, तो शार्दुलच्या लग्नाच्या संगीत सोहळ्याचा आहे. या व्हिडिओची खास गोष्ट म्हणजे गायकही टीम इंडियाचा खेळाडू आहे आणि डान्सरही. आम्ही बोलत आहोत श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकूर यांच्याबद्दल.

ऑस्ट्रेलियाकडून तिसऱ्या कसोटीला अजून वेळ आहे, त्यामुळे टीम इंडियाचे काही खेळाडू शार्दुलच्या लग्नाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते. श्रेयस अय्यर देखील त्या भारतीय खेळाडूंपैकी एक होता, ज्यांनी स्टेजवर उभे राहून माहोल बनवला.


वास्तविक, आयपीएल फ्रँचायझी कोलकाता नाइट रायडर्सने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये शार्दुल ठाकूर श्रेयस अय्यरने गायलेल्या गाण्यावर नाचताना दिसत आहे. सुरुवातीला दोघेही खांद्याला खांदा लावून गाताना दिसले. त्यानंतर भावी पत्नी दिसल्यावर शार्दुल स्टेजवरून खाली उतरला आणि श्रेयसने गायलेल्या गाण्यावर तिच्यासोबत नाचू लागला. श्रेयस अय्यरच्या गाण्यावर शार्दुलचा त्याच्या भावी पत्नीसोबतचा डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


तसे, याआधी शार्दुल ठाकूरच्या मेहंदी सोहळ्याचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता, ज्यामध्ये त्याने पिवळ्या कुर्त्यामध्ये झिंगाट गाण्यावर मनापासून डान्स केला होता.

शार्दुल ठाकूर आज त्याची नववधू मिताली परुलकरसोबत सप्तपदी घेणार आहे. दोघेही एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखतात. मिताली आणि शार्दुलचा दोन वर्षांपूर्वी साखरपुडा झाला होता. शार्दुल ठाकूरने काही महिन्यांपूर्वी एका मुलाखतीत आपल्या लग्नाची घोषणा केली होती.