नेमारची एक्स गर्लफ्रेंड करणार बॉलीवूडमध्ये प्रवेश, या अभिनेत्रीला मानते आदर्श


ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमारची एक्स गर्लफ्रेंड नतालिया बारुलिक सध्या भारत दौऱ्यावर आहे. नतालियाला बॉलीवूडमध्ये काम करायचे आहे आणि हे देखील तिच्या भारतात येण्याचे एक प्रमुख कारण आहे. यासाठी ती खूप मेहनतही घेत आहे. टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना तिने आपल्या योजनेबद्दल सांगितले.

नतालिया सध्या हिंदी बोलायला शिकत आहे. यासोबतच ती भारतीय शास्त्रीय नृत्य कथ्थक देखील शिकत आहे. ती म्हणाली, ‘मी इथे अभिनयही शिकतेय. मला नेहमीच भारतात यायचे होते. मला इथली लोकं, इथली संस्कृती आणि बॉलीवूड आवडतं, देवाची इच्छा असेल, तर काही प्रोजेक्ट येऊ शकतात.

ती पुढे म्हणाली, ‘मला वाटतं बॉलिवूडला लॅटिनाची गरज आहे. मी कथ्थक शिकत आहे, हे सोपे नाही. हे खूप अवघड आहे. फूटवर्क खूप वेगवान आहे आणि बरीच हालचाल करावी लागते. तरी मी सर्वकाही शिकण्याचा प्रयत्न करीत आहे. मला इथे स्वतःसाठी जागा बनवायची आहे’

नतालियाने बॉलिवूडमधील तिच्या आवडत्या अभिनेता आणि अभिनेत्रीबद्दलही सांगितले. ती म्हणाली, ‘मला बॉलिवूड चित्रपट आवडतात. कतरिना कैफला मी माझा आदर्श मानते. मला आशा आहे की मी तिला एक दिवस भेटू शकेन. मला सलमान खानही आवडतो. मला हॉलिवूडपेक्षा बॉलिवूड अभिनेत्री जास्त आवडतात.

नेमारची मैत्रीण म्हणून ओळखले जाणे नतालियाला आवडत नाही. ती म्हणाली, माझ्यासाठी सर्वात मोठी समस्या ही आहे की मला कोणाची तरी गर्लफ्रेंड म्हणून ओळखले जाते, हे लोक खूप लोकप्रिय आहेत ज्यामध्ये माझी प्रतिभा दडलेली आहे. माझ्यात खूप काही आहे, फक्त मला चमकण्याची संधी मिळत नाही, पण ती वेळ नक्कीच येईल.