बाबर आझमने उचलली बॅट, हसन अलीने खेळपट्टीवरून धावत वाचवला स्वतःचा जीव, व्हिडिओ


बाबर आझमच्या अप्रतिम खेळीनंतरही त्याचा संघ पेशावर झल्मीला पराभवाचा सामना करावा लागला. पाकिस्तान सुपर लीगच्या सामन्यात इस्लामाबाद युनायटेडने पेशावरचा 6 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पेशावरने 8 गडी गमावून 156 धावा केल्या. प्रत्युत्तरात इस्लामाबादने 14.5 षटकांत 4 गडी गमावून लक्ष्य सहज गाठले. बाबर 75 धावांवर नाबाद राहिला. त्याने आपल्या खेळीत 7 चौकार आणि 1 षटकार मारला.

पेशावरचा संघ सामना हरला असेल, पण कर्णधार बाबरने या काळात त्याच्या फलंदाजीचा खूप आनंद लुटला. त्याने इस्लामाबादचा गोलंदाज हसन अलीचीही टिंगल केली. खरे तर हसनच्या षटकातील एका चेंडूवर तो सिंगल घेण्यासाठी धावला. यादरम्यान त्याने हसनची मस्करी केली.


खेळपट्टीच्या मध्यभागी पोहोचून बाबरने समोर उभ्या असलेल्या हसनला बॅट दाखवली. बाबरने गोलंदाजाला घाबरवण्याचा प्रयत्न केला. हसननेही खेळपट्टीवरून पळ काढत स्वत:ला सावरले. यानंतर तो हसताना दिसला. या सामन्यात हसन अलीने 35 धावांत 3 बळी घेतले आणि तो सामनावीर ठरला.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर बाबर आणि मोहम्मद हॅरिस वगळता पेशावरच्या एकही फलंदाजाला म्हणावा तसा खेळ करता आला नाही. हॅरिसने 21 चेंडूत 40 धावा ठोकल्या. पेशावरच्या 6 फलंदाजांना 8 धावांपर्यंत मजल मारता आली. इस्लामाबादकडून हसन अलीने सर्वाधिक 3 बळी घेतले. पेशावरने दिलेल्या 157 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना इस्लामाबादकडून रहमानउल्ला गुरबाजने 31 चेंडूत 62 धावा करत सर्वाधिक धावा केल्या. दुसरीकडे, रसी व्हॅन डर डुसेनने 29 चेंडूत 42 धावा आणि आसिफ अलीने 13 चेंडूत नाबाद 29 धावा करत इस्लामाबादला विजय मिळवून दिला.