WPL Auction : भारताचे करोडपती महिला खेळाडू, ज्यांच्यासाठी फ्रँचायझींनी उघडली आपली तिजोरी


वुमन्स प्रीमियर लीग (WPL) च्या पहिल्या सत्राचा लिलाव मुंबईत होत असून पाच संघ खेळाडूंवर पैशांचा पाऊस पाडत आहेत. भारतीय खेळाडूंवरही जोरदार पाऊस पडत आहे. भारताच्या दिग्गज खेळाडूंवर मोठ्या प्रमाणावर पैशांचा वर्षाव होत आहे. आम्ही तुम्हाला अशा भारतीय खेळाडूंबद्दल सांगणार आहोत ज्यांच्यावर पैशांचा पाऊस पडला आणि ते करोडपती बनण्यात यशस्वी ठरले.

यामध्ये पहिले नाव भारताची सलामीवीर स्मृती मंधाना आहे. मुंबई इंडियन्ससोबत झालेल्या लढतीनंतर मंधानाला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आपल्या संघात समाविष्ट केले आहे. या संघाने मंधानासाठी 3.40 कोटी रुपये दिले आहेत.

तिच्यानंतर टीम इंडियाची अष्टपैलू दीप्ती शर्माचा नंबर लागतो, जिच्यासाठी यूपी वॉरियर्सने आपली तिजोरी उघडली आणि 2.60 कोटी रुपये खर्च केले.

भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरवरही पैशांचा जोरदार वर्षाव करण्यात आला. मुंबई इंडियन्सने हरमनप्रीत कौरसाठी 1.80 कोटी रुपये मोजले.

भारतीय संघाची वेगवान गोलंदाज रेणुका ठाकूरही करोडपती बनण्यात यशस्वी ठरली. बंगळुरूने तिच्यासाठी 1.50 कोटी रुपये मोजले आहेत.

पाकिस्तानविरुद्धच्या T20 विश्वचषकातील पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या विजयाची हिरो ठरली जेमिमा रॉड्रिग्ज. या लिलावात ती देखील करोडपती बनण्यातही यशस्वी ठरली. तिला दिल्लीने 2.20 कोटी रुपये मोजले.

शेफाली वर्मा तिच्या तुफानी फलंदाजीसाठी ओळखली जाते. तिच्यासाठी दिल्लीने दोन कोटी रुपये खर्च केले. तिच्यासाठी दिल्ली लढली, मुंबई लढली.