आदिलने माझे खाजगी व्हिडिओ विकले… राखी सावंतचा पतीवर आणखी एक गंभीर आरोप


या ना त्या कारणाने राखी सावंत नेहमीच चर्चेचा भाग असते. सध्या तिच्या वैवाहिक जीवनात भूकंप आला आहे. तिने पती आदिल खानवर फसवणूक, कौटूंबिक हिंसाचाराचे आरोप केले आहेत. आदिल सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याचवेळी राखी याप्रकरणी रोज नवनवीन खुलासे करत आहे. आता तिने आदिलवर आणखी एक गंभीर आरोप केला आहे.

राखीने सांगितले की, आदिलने तिचे खाजगी व्हिडिओ विकले आहेत. राखीने याबाबत ETimes ला सांगितले आहे. ती म्हणाली, “आदिलने माझे न्यूड व्हिडिओ काढले आणि लोकांना विकले. या संदर्भात माझी केस सायबर क्राइम विभागात आहे.

अलीकडेच राखीने आदिलच्या गर्लफ्रेंडचा खुलासा केला. तिने आदिलच्या मैत्रिणीचे नाव तनू सांगितले. या संवादात राखीने असेही सांगितले की, आता तिसऱ्यांदा आदिलला तनुशी लग्न करायचे आहे. राखीच्या म्हणण्यानुसार, आदिलचे आधीच लग्न झाले होते आणि राखीसोबत आदिलचे हे दुसरे लग्न आहे. अलीकडेच राखी आदिलच्या पहिल्या लग्नाची पत्रिका घेऊन पापाराझींसमोर आली होती.

राखी सावंतचा एक ताजा व्हिडिओ व्हायरल भयानीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे, ज्यामध्ये राखी म्हणत आहे की तिला धमक्या येत आहेत. व्हिडिओमध्ये राखी हिजाब परिधान केलेली दिसत होती. तिथे ती म्हणते, “माझा खूप छळ होत आहे. मला धमक्या येत आहेत की मी गप्प बसले नाही, तर माझे सर्व व्हिडिओ व्हायरल होतील. राखी सावंतने 6 फेब्रुवारीला आदिलविरोधात तक्रार दाखल केली होती. आदिलला 7 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती आणि 8 फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

मात्र, आता या प्रकरणात आणखी काय होते, हे पाहावे लागेल. आदल्या दिवशी पापाराझींशी बोलताना राखीने सांगितले होते की, आदिलने तिच्यावर अत्याचार केले, तिची फसवणूक केली, त्यामुळे आदिलला जामीन मिळू नये.