क्षणात सर्व काही उद्ध्वस्त, भूकंपाचा व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावर उभा राहिल काटा


बॉम्बस्फोटासारखा मोठा आवाज. आरडाओरडा आणि लोक धावत आहेत. आज तुर्कस्तानची जमीन भूकंपाच्या जबरदस्त धक्क्याने हादरली. भूकंप एवढा तीव्र होता की, उंच इमारतींचे ढिगाऱ्यात रुपांतर झाले. मदत-मदत म्हणत लोक इकडे तिकडे धावत होते. दक्षिण तुर्कस्तानमध्ये पहाटे 4 वाजता 7.9 रिश्टर स्केलचा हा भूकंप झाला. या भूकंपात शेकडो लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यत वर्तवण्यात येत आहे.


सीरिया, लेबनॉन, इस्रायल, पॅलेस्टाईन आणि सायप्रस आणि इराकपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले यावरून या विनाशाचा अंदाज लावता येतो. हा भूकंप 17.9 किलोमीटर खोलीवर झाला आणि त्याचे केंद्र गाझियानटेप शहराजवळ होते. भूकंपाचे जे व्हिडीओ समोर आले आहेत ते पाहून तुमच्या अंगावरही काटा उभा राहिल.


भूकंपानंतर लोक ढिगाऱ्यात अडकले आणि लाइव्ह स्ट्रीम व्हिडिओद्वारे मदत मागताना दिसले. सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करून लोक आपली अवस्था सांगत आहेत. दरम्यान सध्या तुर्कस्तानमध्ये बचावकार्य सुरू आहे. अनेक एजन्सी लोकांना वाचवण्यात व्यस्त आहेत. अनेक इमारती मोडकळीस आल्या आहेत. त्याच्या आत लोक गाडले जाण्याचीही शक्यता आहे.


सोशल मीडियावर ज्या प्रकारचे व्हिडिओ पोस्ट केले जात आहेत ते अस्वस्थ करणारे आहेत. लोक इकडे तिकडे धावत आहेत. जमिनीवर मोठमोठ्या इमारती दिसतात. भूकंप इतका तीव्र होता की लोकांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. रिश्टर स्केलवर 7 च्या वरचा भूकंप अत्यंत धोकादायक मानला जातो.