धोनी एंटरटेनमेंटच्या पहिल्या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज


भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनी सध्या आयपीएलच्या तयारीत व्यस्त आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्जला चॅम्पियन बनवण्याची तयारी केली आहे. हे त्याचे शेवटचे आयपीएल असू शकते असेही मानले जात आहे. त्याच्या आयपीएल कारकिर्दीचाही शेवटचा टप्पा आहे. आयपीएलला अलविदा करण्यापूर्वीच धोनीने चित्रपट निर्मितीत पाऊल टाकले आहे. तो याक्षेत्रात पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. धोनी एंटरटेनमेंटच्या पहिल्या प्रोडक्शन चित्रपटाचे मोशन पोस्टर शुक्रवारी प्रदर्शित झाले.

लेट्स गेट मॅरीड असे या चित्रपटाचे नाव आहे. या तमिळ चित्रपटात साऊथचे स्टार्स दिसणार आहेत. धोनीच्या या ड्रीम प्रोजेक्टची मुख्य अभिनेत्री इव्हाना असेल. सोबतच हरीश कल्याण देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश थमिलमणी असतील.


थमिलमनी यांच्या मते, चित्रपटाची संकल्पना धोनीची पत्नी साक्षी धोनीने लिहिली आहे. धोनी एंटरटेनमेंट कंपनी जानेवारी 2019 मध्ये सुरू झाली आणि त्याच्या प्रोडक्शन हाऊसने आतापर्यंत 3 लघुपट बनवले आहेत. मोशन पोस्टर पाहता तो रोड ट्रिप या रोमँटिक ड्रामावर आधारित असल्याचे दिसते. थमिलमनी यांच्या म्हणण्यानुसार, साक्षीची संकल्पना वाचल्यानंतर मला ती विशेष असल्याचे कळले. हे पूर्णपणे ताजे आणि कौटुंबिक मनोरंजनासाठी योग्य आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने साक्षी सध्या चेन्नईत आहे.

साक्षी चित्रपटात व्यस्त आहे, तर एमएस धोनी आयपीएलच्या तयारीत व्यस्त आहे. त्याने नेट प्रॅक्टिसही सुरू केली आहे. आदल्या दिवशी तो टीम इंडियाला भेटण्यासाठी रांचीच्या स्टेडियममध्ये पोहोचला होता. खरं तर, रांचीमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मालिकेतील पहिला टी-20 सामना होणार आहे.