प्रेयसीने जोडे-चप्पलने धुतलेल्या मायकल क्लार्कचे करोडोंचे नुकसान


प्रेयसीकडून झालेल्या मारहाणीनंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कच्या अडचणीत वाढ झाली आहे. आधी त्याची प्रतिमा खराब झाली आणि आता त्यांचे करोडोंचे नुकसान झाले आहे. नुकताच क्लार्कचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये त्याची गर्लफ्रेंड जेड यारब्रो त्याला बेदम मारहाण करताना दिसत आहे. यारब्रोने त्याच्यावर फसवणूक केल्याचा आरोप केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शूज आणि चप्पल बनवणाऱ्या ऑस्ट्रेलियन कंपनीने क्लार्कसोबत काम करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पादत्राणे आणि कपड्यांच्या एका प्रमुख ब्रँडने क्लार्कपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑस्ट्रेलियन ब्रँडने पुष्टी केली आहे की त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर क्लार्कसोबत काम करण्याचा कोणताही हेतू नाही. ऑस्ट्रेलियाच्या सुप्रसिद्ध ब्रँडने सांगितले की, क्लार्कशी त्यांचे नाते गेल्या वर्षी सुरू झाले आणि गेल्या वर्षीच संपले आणि आता या वादानंतर हे नाते पुन्हा सुरू करण्याचा त्यांचा कोणताही विचार नाही.

त्यांच्या ब्रँडने क्लार्कसोबत फक्त एकदाच काम केले आहे, कंपनीने गेल्या वर्षी सप्टेंबरच्या सुरुवातीला त्याच्यासोबत फादर्स डे शूट केले होते, असे निवेदनात म्हटले आहे. आता हा ब्रँड भविष्यात पुन्हा कधीही क्लार्कसोबत काम करणार नाही. त्यामुळे भविष्यात क्लार्कचा या ब्रँडसोबत करोडोंचा करार होण्याची शक्यताही संपुष्टात आली आहे.

इतकेच नाही तर क्लार्कला भारत ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेच्या कॉमेंट्री पॅनलमधूनही वगळले जाऊ शकते, अशा बातम्या येत आहेत. बीसीसीआयने कॉमेंट्री पॅनलसाठी माजी ऑस्ट्रेलियन कर्णधाराशी करार केला होता, परंतु आता मीडिया रिपोर्ट्सनुसार, बोर्डाने त्याची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे, असे झाल्यास त्याला सुमारे 82 लाख रुपयांचे नुकसान होऊ शकते.

पूर्वी, क्लार्क त्याची प्रेयसी, तिची बहीण आणि पतीसोबत सुट्टीवर गेला होता, जिथे मैत्रिणीने त्याला मारहाण केली आणि आरोप केला की तो त्याच्या माजी मैत्रिणी पिप एडवर्डसला भेटला होता आणि तिच्यासोबत भारताला भेट देण्याचा विचार करत होता. जेड यारब्रोच्या बहिणीने हे प्रकरण हाताळण्यासाठी त्याला खेचले, परंतु भांडणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर क्लार्क स्वतःला अडचणीत सापडला.