मुकेश अंबानींनी का केला सलमान खानच्या गाण्यावर डान्स, डान्स पाहून तुम्हीही म्हणाल ‘भाई वाह…’


देशातील अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांचा एक डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये ते आपल्या कुटुंबासह सलमान खानच्या ‘हम आपके है कौन’ या चित्रपटातील एका गाण्यावर डान्स करत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल… भाई वाह!

वास्तविक हा व्हिडिओ मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या साखरपुडा समारंभाचा आहे. व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी, त्यांची पत्नी नीता अंबानी, मुलगी ईशा अंबानी आणि तिचे पती आनंद पिरामल, मोठा मुलगा आकाश अंबानी आणि त्यांची पत्नी श्लोका मेहता अंबानी देखील डान्स करत आहेत.


अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा एंगेजमेंट फंक्शन मुकेश अंबानींच्या अँटिलिया येथे पार पडला. या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला. राधिका मर्चंट ही अनंत अंबानींची बालपणीची मैत्रिण आहे. देशातील आघाडीची फार्मास्युटिकल कंपनी एनकोर हेल्थकेअरचे सीईओ अब्जाधीश उद्योगपती वीरेन मर्चंट यांची ती मुलगी आहे. तिच्या आईचे नाव शैला मर्चंट आहे.

राधिका मर्चंटचा जन्म 18 डिसेंबर 1994 रोजी झाला. तिला शास्त्रीय नृत्याची आवड आहे, तसेच तिने आठ वर्षांपासून भरतनाट्यमची दीक्षा घेतली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात, मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी त्यांच्या भावी धाकट्या सून, राधिका मर्चंटसाठी अरंगेत्रम समारंभ आयोजित केला होता.

राधिकाने तिचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील इकोले मोंडियाल वर्ल्ड स्कूल आणि बीडी सोमाणी इंटरनॅशनल स्कूलमधून केले. नंतर त्यांनी 2017 मध्ये न्यूयॉर्क विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदवी प्राप्त केली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती भारतात आली आणि इंडिया फर्स्ट ऑर्गनायझेशन आणि देसाई आणि दिवाणजी यांसारख्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करू लागली.

यानंतर त्यांनी मुंबईतील रिअल इस्टेट कंपनी इसप्रवामध्ये ज्युनिअर सेल्स मॅनेजर म्हणून काम केले आणि त्यानंतर कौटुंबिक व्यवसायात सहभागी झाले. राधिका मर्चंटला पोहण्याची खूप आवड आहे. याशिवाय ती तिच्या मैत्रिणींसोबत अनेकवेळा ट्रेकिंगलाही गेली आहे. त्याच वेळी, तिला वाचनाची आवड आहे आणि ती एक प्राणीप्रेमी देखील आहे.