Women’s IPL : महिला आयपीएल विजेत्या संघाला मिळणार 6 कोटी? एका संघात खेळू शकतात पाच परदेशी खेळाडू


भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) मार्चमध्ये महिला आयपीएल सुरू करणार आहे. स्पर्धेच्या पहिल्या सत्राचे मीडिया हक्क विकले गेले आहेत. Viacom18 ने 951 कोटी रुपयांना पाच वर्षांसाठी प्रसारण हक्क विकत घेतले होते. आता या स्पर्धेची ताजी माहिती समोर येत आहे की ही स्पर्धा 4 मार्चला सुरू होऊ शकते आणि त्याच महिन्याच्या 26 तारखेला अंतिम सामना खेळवला जाऊ शकतो.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिलांचे आयपीएल सामने मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियम आणि डीवाय पाटील स्टेडियमवर होऊ शकतात. पहिल्या सत्रात एकूण 22 सामने खेळले जाऊ शकतात. पुरुषांच्या आयपीएलसाठी मुंबईचे वानखेडे स्टेडियम सज्ज ठेवण्यात येणार आहे. पुरुषांची आयपीएल 31 मार्च किंवा 1 एप्रिलपासून सुरू होण्याची शक्यता आहे.

किती असेल बक्षिसाची रक्कम?
महिला आयपीएलमधील खेळाडूंची बक्षीस रक्कम 10 कोटी रुपयांपर्यंत असू शकते. ही स्पर्धा जिंकणाऱ्या संघाला 12 कोटी रुपये मिळू शकतात. त्याचबरोबर उपविजेत्याला तीन कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघाला 1 कोटींवर समाधान मानावे लागू शकते.

प्लेइंग इलेव्हनमध्ये राहतील किती परदेशी?
पुरुषांच्या आयपीएल दरम्यान, एका संघाच्या प्लेइंग-11 मध्ये जास्तीत जास्त चार विदेशी खेळाडू असतात. महिलांच्या आयपीएलमध्ये हा नियम मोडला जाऊ शकतो. प्लेइंग-11 मध्ये पाच परदेशी खेळाडूंना परवानगी दिली जाईल, परंतु त्यापैकी एक सहयोगी देशाचा असेल.

किती असेल पगाराची मर्यादा?
बीसीसीआयने महिला आयपीएलसाठी पगाराची मर्यादा निश्चित केली आहे. 12 कोटी रुपये असेल. यात पुढील चार वर्षांसाठी दरवर्षी दीड कोटी रुपयांची वाढ होणार आहे. पाचव्या वर्षी ही रक्कम 18 कोटी रुपये होईल. पुरुषांची आयपीएल सुरू झाली तेव्हा आयकॉन खेळाडूंची निवड करण्यात आली. महिलांच्या आयपीएलमध्ये असे काहीही होणार नाही. पहिल्या तीन वर्षांत प्रत्येकी पाच संघ खेळतील. त्यानंतर दोन वर्षांनी सहा संघ सहभागी होतील.