Viral Video : जादूगाराची जादू पाहून लोकांची चक्रावली डोकी, म्हणाले- असे होऊच शकत नाही


जादू ही एक अशी गोष्ट आहे, जी तरुण आणि वृद्ध सर्वांनाच आवडीने पाहायला आवडते. समोरची व्यक्ती हाताची सफाई दाखवत आहे, हे माहिती असुनसुद्धा. पण आजकाल असा एक जादूचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, जो पाहून लोक चक्रावले आहेत. काही सेकंदांची ही क्लिप इंटरनेटवर दहशत निर्माण करत आहे. क्लिप पाहिल्यानंतर लोक म्हणत आहेत – असे होऊच शकत नाही. आमच्यावर विश्वास ठेवा, तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा नक्की पहाल.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक पुरुष एका महिलेला जादू दाखवत आहे. पुरुष प्रथम स्त्रीला तिचे दोन्ही हात पुढे करण्यास सांगतो. मग तिचा हात धरून तो असे काही करतो की महिलेला धक्काच बसतो. पण यानंतर ती जे काही पाहते ते पाहून ती खूप घाबरते. जादूगाराने काय केले ते आम्ही तुम्हाला सांगणार नाही. ते तुम्ही स्वतः या व्हिडिओमध्ये पहा.


जादुगाराचा हा जादुई व्हिडिओ @TheFigen_ या हँडलवरून ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. युजरने कॅप्शन दिले आहे, अरे… हे खूप भयानक आहे. 17 सेकंदांची ही क्लिप इंटरनेटवर येताच खळबळ उडाली आहे. वृत्त लिहिपर्यंत या व्हिडिओला 41 हजारांहून अधिक लाईक्स आणि 21 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ही संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याच वेळी, ट्विटर वापरकर्ते व्हिडिओवर जोरदार कमेंट आणि शेअर करत आहेत.

असे होऊच शकत नाही असे एका वापरकर्त्याने म्हटले आहे. कुणाची सावली कशी थांबेल. तर, दुसरा म्हणतो, ते टेबल नाही तर मॉनिटर आहे. ज्याद्वारे लोकांना फसवले गेले आहे. आणखी एका यूजरने आश्चर्य व्यक्त करत लिहिले आहे, अरे तेरी, हे कसे झाले. आणखी एका युजरने लिहिले आहे, काहीही असो, पण जादू अप्रतिम होती.