ऋषभ पंतच्या पुढील उपचारासाठी DDCA प्रमुखांनी घेतला मोठा निर्णय


भारताचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंत रस्ते अपघाताचा बळी ठरला. रुरकीजवळ कार अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. डेहराडूनमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत, मात्र आता दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनने (डीडीसीए) मोठा निर्णय घेतला आहे. DDCA पंतला उपचारासाठी मुंबईला घेऊन जाणार आहे. त्याचवेळी त्याच्या लिगामेंटच्या दुखापतीवर उपचार केले जातील.

काय म्हणाले DDCA चे संचालक?
डीडीसीएचे संचालक श्याम शर्मा म्हणाले- क्रिकेटपटू ऋषभ पंतला पुढील उपचारांसाठी आज मुंबईला हलवण्यात येणार आहे. 30 डिसेंबर रोजी झालेल्या कार अपघातानंतर पंत यांच्यावर डेहराडूनमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दुखापतीबाबत बीसीसीआयने काय दिले अपडेट ?
पंतच्या डोक्यात दोन कट असल्याची माहिती बीसीसीआयने दिली होती. त्याच्या उजव्या गुडघ्यातील अस्थिबंधन फाटले असून उजव्या हाताच्या मनगटावर, घोट्याला, पायाच्या बोटाला दुखापत झाली आहे. तसेच, त्याच्या पाठीवर घर्षणाची जखम आहे. पंतची प्रकृती सध्या धोक्याबाहेर आहे, मात्र आता बीसीसीआय आणि डीडीसीएने त्याच्यावर चांगले उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी एकदिवसीय विश्वचषक पाहता बीसीसीआयला पंतला लवकरात लवकर तंदुरुस्त पाहायचे आहे.

पंतच्या दुखापतीवर लक्ष ठेवून होते बीसीसीआय आणि डीडीसीए
पंतच्या एमआरआय स्कॅन अहवालात कोणतीही अडचण आली नाही. अपघातानंतर बीसीसीआयने डीडीसीएला पंतच्या सतत संपर्कात राहून त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले होते. DDCA प्रमुख श्याम शर्मा स्वतः पंतला भेटायला आले होते. याशिवाय उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हेही पंतला भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचले होते.

पंत 30 डिसेंबर रोजी कार अपघाताला पडला होता बळी
टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंत कार अपघाताचा बळी ठरला. रुरकीजवळ त्याची कार दुभाजकाला धडकून उलटली. अपघातानंतर कारने पेट घेतला आणि कार पूर्णपणे जळून खाक झाली. कारची काच फोडून पंत स्वतः बाहेर पडला आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला रुग्णालयात नेले. पंत दिल्लीहून उत्तराखंडमधील आपल्या घरी परतत होता. रुरकीच्या नरसन सीमेवर हम्मादपूर झालजवळ त्याच्या कारला अपघात झाला.

IPL 2023 मध्ये खेळण्याबाबत शंका
बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका खेळल्यानंतर पंत दुबईला पोहोचला होता. तेथून तो 29 डिसेंबरला दिल्लीला आला आणि तेथून खासगी कारने रुरकी येथील त्यांच्या घरी जात होता. श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी पंतचा भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नाही. आता दुखापतीनंतर पंतच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका आणि आयपीएल 2023 मध्ये खेळण्यावर शंका आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतला पूर्णपणे बरे होण्यासाठी चार ते सहा महिने लागू शकतात.