आपल्याला दिवसभर सचेत राहण्यास मदत करतील ‘हे’ खाद्यपदार्थ


रात्रभराची झोप पूर्ण करून सकाळी उठ्ल्यानंतर ही, अजून काही वेळ तरी झोपायला मिळावे असा विचार आपल्या मनामध्ये कधी ना कधी डोकावत असतोच, आणि त्या मोहापायी अलार्म आपण ‘स्नूझ’ करीत राहतो. ऑफिसमध्ये काम करत असताना भरदिवसा देखील काही वेळा झोप अनावर होत असते. असे वारंवार होत असल्यास सकाळी उठल्यानंतर काही ठराविक खाद्यपदार्थांचे सेवन केल्यास आपला मेंदू दिवसभर सचेत राहू शकेल, त्याचबरोबर दिवसभर काम करूनही थकवा जाणवणार नाही.

केळे : केळ्यामधून आपल्या शरीराला सत्वर आणि टिकून राहणारी उर्जा मिळते. केळ्यामध्ये असणारे सुक्रोज, फ्रुक्टोज आणि ग्लोकोज या तीनही प्रकारांनी आपल्या शरीरांमध्ये कमी झालेल्या शुगर लेवल नियंत्रणात आणण्यास मदत मिळते. किती तरी वेळा सकाळी सकाळी भूक लागली म्हणून हाताशी येईल ते पटकन उचलून तोंडात टाकले जाते. केळ्यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असल्याने ही भूक शमतेच, त्याशिवाय पोट पुष्कळ वेळ भरलेले राहिल्याने पुनः पुन्हा भूक लागत नाही.

अॅवोकाडो : यामध्ये असणाऱ्या मोनो सॅच्युरेटेड फॅट मुले आपला मेंदू सचेत होण्यास मदत मिळते. सकाळच्या न्याहारीमध्ये जर टोस्ट घेत असाल तर त्यावर अॅवोकाडोचा गर घालावा किंवा आपल्या सलाड मध्ये ही याचा वापर करता येईल.

दही : दह्यामध्ये कॅल्शियम भरपूर मात्रेमध्ये असते. तसेच प्रथिने ही भरपूर मात्रेमध्ये असल्याने सकाळी न्याहारीमध्ये याचा समावेश अवश्य करावा.

पालक : या मध्ये असलेली कॅरोटेनॉइड आणि अँटी ऑक्सिडंट तत्वे आपल्या मेंदूला सजग राहण्यास मदत करतात. या मध्ये b जीवनसत्व आणि फॉलिक अॅसिडचे प्रमाणही भरपूर असल्याने दिवसभर काम करण्यासाठी लागणारी ताकद या द्वारे आपल्या शरीराला मिळते.

अननस : अननसामध्ये असणारे ‘क’ जीवनसत्त्व आपल्या मेंदूला सचेत ठेवते आणि त्याचबरोबर झोपेला ही लांब पळविते. अननसाच्या सेवनामुळे सत्वर उर्जा मिळते.

पाणी : शरीमध्ये पाण्याची कमी किंवा डीहायड्रेशन असल्यासही शरीरामध्ये उत्साह जाणवत नाही, किंवा सतत थकवा जाणवत राहतो. रात्रभराच्या आठ तासांच्या झोपेमध्ये आपल्या शरीराला पाणी मिळत नाही. आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव आपापले काम करीत असतो. हेच कार्य सुरळीत चालण्याकरिता आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाला पाण्याची गरज असते. त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर पाणी पिण्याची सवय करून घेणे आवश्यक आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment