फिफा वर्ल्ड कप, यंदा प्रथमच नायकेची आदिदास वर कुरघोडी

कतार फिफा वर्ल्ड कप २०२२ ची सांगता झाली आहे. या सामन्यात ३२ संघ उतरले होते आणि अंतिम फेरीत फ्रांसला हरवून आर्जेन्टिनाने वर्ल्ड कप जिंकला आहे. मात्र आर्जेन्टिनाची प्रायोजक स्पोर्ट्स कंपनी आदिदास वर प्रथमच नायके या स्पोर्ट्स कंपनीने कुरघोडी केल्याने ही स्पर्धा दोन स्पोर्ट्स वेअर कंपन्याच्या मधील लढाई ठरली आहे.

आदिदास गेली ४८ वर्षे आर्जेन्टिना टीमला स्पोन्सर करते आहे. आदिदासने १९७४ फिफा वर्ल्ड कप मध्ये १६ टीमचे प्रायोजक म्हणून कामगिरी बजावली असून पैकी ९ वेळा जर्मनीचे प्रायोजकत्व घेतलेले आहे. आदिदास ने फिफा वर्ल्ड कप मध्ये आपले प्रभुत्व कायम ठेवण्याची जणू परंपरा घातली असे वाटत असताना यंदाच्या फिफा वर्ल्ड कप मध्ये ३२ पैकी १३ संघांचे समर्थन करून नायके कंपनीने आदिदास वर कुरघोडी केली आहे.

अंतिम फेरीपूर्वी आदिदास ला मेस्सी जर्सीची डिमांड पूर्ण करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला आणि या काळात त्यांची विक्री ११ टक्के झाली तर नायकेने याच काळात जर्सी विक्री २३ टक्के केली. वर्ल्ड कप मध्ये आदिदास ने आत्तापर्यंत १३४ टीम्सच्या जर्सी स्पोन्सर केल्या आहेत तर नायकेने ६३ राष्ट्रीय टीम साठी जर्सी दिल्या आहेत.