अक्षयकुमारने प्रथमच घडविले घराचे दर्शन

बॉलीवूड मध्ये खिलाडी म्हणून ओळख असलेला अक्षयकुमारने नुकताच ‘फोर्स नाईन’ नावाने स्वतःचा फॅशन ब्रांड लाँच केला असून त्या निमित्ताने प्रथमच स्वतःच्या घरात शुटींग करून घराचे दर्शन घडविले आहे. सोशल मिडीयावर हा व्हिडीओ वेगाने व्हायरल झाला आहे. यात अक्षय सांगतो, प्रथमच मी घरात शूट केले आहे.

आपल्या ब्रांडचे नाव ‘फोर्स नाईन’ ठेवण्याचे कारण सांगताना अक्षय म्हणतो, ‘ ही सर्वात मोठी शक्ती आहे, ही शक्ती ब्रह्मांड नियंत्रित करते. दुसरी शक्ती आहे मदर नेचर म्हणजे निसर्ग. आणि तिसरी शक्ती म्हणजे आर्म फोर्स. माझे वडील आर्मी मध्ये होते. माझा लकी नंबर नऊ आहे आणि माझी जन्मतारीख सुद्धा नऊ आहे. या दोन्हीच्या संयोगातून फोर्स नाईन हे नाव निवडले आहे.’

या व्हिडीओ मध्ये अक्षयने त्याचे वॉर्ड रोब कलेक्शन सुद्धा दाखविले आहे. अक्षय म्हणतो त्याला आरामदायी कपडे आवडतात. शक्य असेल तर तो रोज ट्रॅक पँट वापरण्यास पंसती देईल, हुडी घालेल, पातळ शर्ट वापरेल. कपडे घातल्यावर छान वाटले पाहिजे अशी त्याची अपेक्षा असते. त्यांच्या ब्रांड मध्ये तरुण डिझायनर टीम काम करते आहे आणि यातील सर्व कपडे भारतातच बनणार आहेत.