प्रख्यात उद्योगपती विक्रम एस किर्लोस्कर यांचे निधन


टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष विक्रम एस किर्लोस्कर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 64 वर्षांचे होते. मोटर कंपनीने बुधवारी ही माहिती दिली. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, “29 नोव्हेंबर 2022 रोजी टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष विक्रम एस किर्लोस्कर यांच्या अकाली निधनाबद्दल आम्हाला कळवताना अत्यंत दु:ख होत आहे.” या दु:खाच्या प्रसंगी सर्वांनी दिवंगत आत्म्याला शांती लाभो हीच प्रार्थना करावी.

बुधवारी दुपारी १ वाजता बेंगळुरू येथील हेब्बल स्मशानभूमीत त्यांना अंतिम श्रद्धांजली वाहण्यात येईल, असे कंपनीने सांगितले. विक्रम किर्लोस्कर यांनी MIT मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग ची पदवी घेतली होती . ते किर्लोस्कर सिस्टम्स लिमिटेडचे ​​अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक होते. याशिवाय ते किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेडचे ​​उपाध्यक्षही होते. विक्रम किर्लोस्कर हे किर्लोस्कर समूहाच्या चौथ्या पिढीचे प्रमुख होते. किर्लोस्कर यांच्या पश्चात पत्नी गीतांजली किर्लोस्कर आणि मुलगी मानसी किर्लोस्कर असा परिवार आहे.