बार्सिलोना फुटबॉल क्लबकडून ‘राहा’चे स्वागत

रणबीर कपूर, आलिया भट्ट यांची कन्या ‘राहा’ हिचे बार्सिलोना फुटबॉल क्लब कडून स्वागत केले गेले असून त्यांच्या क्लबला नवीन चाहता मिळाला असे म्हटले आहे. या संदर्भात बार्सिलोना क्लबने एक ट्वीट केले आहे. त्यात लिहिले गेलेय, ‘ बधाई हो, आलिया रणबीर, बार्सिलोनाच्या नव्या फॅन ने जन्म घेतला आहे. आम्ही सर्व आपल्या बार्सिलोना भेटीची प्रतीक्षा करत आहोत.’ या ट्वीट सोबत आलियाने मुलीच्या नावाचा शेअर केलेला फोटो सुद्धा क्लबने पोस्ट केला आहे.

राहाचे फुटबॉल कनेक्शन काय असा प्रश्न अनेकांच्या मनात असेल. तर त्याचे उत्तर असे कि राहाचे वडील म्हणजे रणबीर याला फुटबॉलची प्रचंड आवड असून जेव्हा अभिनयातून मोकळीक मिळते तेव्हा तेव्हा तो फुटबॉल मैदानात दिसतो. रणबीर इंडियन सुपर लीग टीम मुंबई सिटी चा सहमालक आहे. आणि बार्सिलोना क्लबचा चाहता आहे. रणबीरचे बार्सिलोना प्रेम त्या क्लबला सुद्धा माहिती आहे. म्हणूनच त्यांनी रणबीरच्या वाढदिवशी बार्सिलोना एफसी चा टी शर्ट त्याला पाठविला होता. या टी शर्टवर बॅलन डी ओर विनर लियोनेल मेस्सी यांची सही सुद्धा आहे. रणबीरने हा टीशर्ट घालून काढलेले अनेक फोटो शेअर केले आहेत.

राहा कपूरच्या आंतरराष्ट्रीय लेवल वर झालेल्या स्वागताने सर्वानाच आनंद झाला असून राहा आत्ताच जगात प्रसिद्ध झाल्याच्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.