सिनेजगतातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. बॉलिवूड आणि टीव्हीमध्ये काम केलेले ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले आता या जगात नाहीत. विक्रम गोखले गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल होते. जिथे त्यांची प्रकृती चिंताजनक होती. आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते . मात्र आता त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच दुःख झाले आहे.
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन
विक्रम गोखले यांचं पार्थिव आज दुपारी चार वाजता पुण्यातील बालगंधर्व रंग मंदिर येथे अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. त्यानंतर सहाच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
चित्रपट पार्श्वभूमीशी संबंधित
विक्रम गोखले हे मराठी रंगभूमी, हिंदी चित्रपट आणि टेलिव्हिजनमध्ये सक्रिय होते. ते चित्रपट अभिनेते चंद्रकांत गोखले यांचे पुत्र होते. विक्रम गोखले यांची आजी कमलाबाई गोखले या भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या महिला बालकलाकार होत्या.
विक्रम गोखले यांनी वयाच्या २६ व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी ८३ चित्रपट, ४२ हून अधिक दूरचित्रवाणी मालिका आणि अनेक नाटके यामध्ये अभिनय केला. सन २०१० पासून त्यांनी आघात या चित्रपटापासून त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले.
अभिनयासाठी त्यांना संगीत नाटक अकादमी आणि फिल्म फेअरसारख्या अनेक प्रतिष्ठेच्या अनेक पुरस्कारांनी विक्रम गोखले यांना सन्मानित करण्यात आले.
