आलिया रणबीर कन्येचे नाव एक, पण अर्थ अनेक

बॉलीवूड मधील लोकप्रिय जोडी आलिया आणि रणबीर यांच्या घरी कन्यारत्नाचे आगमन झाले आणि मुलीचे नाव काय ठेवणार याची एकच चर्चा सुरु झाली. आता आलियाने इन्स्टावर एक व्हिडीओ शेअर करून मुलीच्या नावाचा खुलासा केला आहे. या व्हिडीओ मध्ये आलिया आणि रणबीर याचे पुसट फोटो दिसत असून रणबीरच्या हातात एक बाळ दिसते आहे. याच फोटोत भिंतीवर लाल निळ्या टी शर्ट आणि शॉर्टस दिसत असून त्यावर ‘राहा’ अशी अक्षरे दिसत आहेत. होय, आलियाच्या मुलीचे नामकरण ‘राहा’असेच केले गेले असून हे नाव आजी नीतू सिंग हिने ठेवले आहे.

आलिया म्हणते, राहा याचा अर्थ दिव्य मार्ग, दिव्य रस्ता. स्वाहिली भाषेत याचा अर्थ ख़ुशी, संस्कृत भाषेत राहा म्हणजे कुळ, वंश किंवा गोत्र. बंगाली भाषेत याचा अर्थ आराम, सुख, रिलीफ असा आहे. अरेबिक भाषेत राहा म्हणजे शांती शिवाय आनंद, स्वातंत्र्य, व कल्याण असेही या नावाचे अर्थ आहेत. आलिया म्हणजे जेव्हा मी प्रथम तिला कुशीत घेतले तेव्हा या सर्व भावना अनुभवल्या. आलियाने ‘ राहा ला धन्यवाद, आमच्या आयुष्यात तू अर्थ भरलास, आयुष्य आत्ताच सुरु झाले असे वाटतेय’ असेही लिहिले आहे.