ही आहे जगातील सर्वात सुंदर पोलीस अधिकारी

कोलंबियाच्या मेडेलिन मधील एक महिला पोलीस अधिकारी सध्या सोशल मिडीयावर खूपच फेमस झाली असून तिचे वर्णन जगातील सर्वात सुंदर पोलीस अधिकारी असे केले जात आहे. इन्स्टाग्रामवर तिचे ४ लाख फॉलोअर्स आहेत. न्यूयॉर्क पोस्ट च्या बातमीनुसार ही अधिकारी मेडेलिनच्या रस्त्यातून गस्त घालत असते. विशेष म्हणजे हे शहर जगातील सर्वाधिक धोकादायक शहरात सामील आहे.

या सुंदर पोलीस अधिकारी महिलेचे नाव आहे डायना रामिरेज. ती म्हणते,’ मॉडेल किंवा ऑनलाईन इंफ्ल्यूइन्सर बनण्यासाठी ती तिची नोकरी सोडणार नाही. तिला पुन्हा नव्याने करियर निवडायची संधी मिळाली तर ती पोलीस अधिकारी बनण्यासच पसंती देईल. कारण याच संस्थेमुळे ती ‘इन्स्टापेस्ट अॅवॉर्डस बेस्ट पोलीस व मिलिटरी इंफ्ल्यूएन्सर ऑफ द इअर’ साठी नामांकित झाली आहे.

या नामांकनासोबत पोलीस दलाचे प्रतिनिधित्व करणे सन्मानाचे असल्याचे डायनाचे म्हणणे आहे. हे काम खूप समाधानकारक आहे असे सांगून डायना म्हणते, रोज काम करणार्या व चांगल्या देशाच्या निर्माणात योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे काम व समर्पण सोशल मिडियावर दाखविले जाते.