आपले तडाखेबंद फलंदाज वापरतात या बॅटस

ऑस्ट्रेलियातील टी २० वर्ल्ड कप आता बहरात आला असून टीम इंडियाकडून विजयाच्या मोठ्या अपेक्षा क्रिकेट चाहत्यांना आहेत. क्रिकेट हा भारतात अतिशय लोकप्रिय खेळ असून सामने सुरु असतात तेव्हा चाहते कामेधामे सोडून खेळ बघत बसतात हे नित्याचे दृश्य आहे. विराट कोहली, सुर्यकुमार, रोहित यांचे चौके, छक्के चर्चेत सातत्याने आहेत. पण असा तडाखेबंद खेळ करण्यासाठी हे खेळाडू कुठल्या बॅटस वापरतात याची महिती फारशी कुणाला नसावी.

सध्या फारच फॉर्मात असलेल्या विराट बद्दल बोलायचे तर तो २०१४ पासून एमआरएफ ची बॅट वापरतो आहे. या बॅटसचे वजन १.१ ते १.२६ किलो पर्यंत असून किमती १७ ते २३ हजार दरम्यान आहेत. क्रिकेट मध्ये सध्या चांगलाच गाजत असलेला सूर्यकुमार यादव एसएसकेवाय प्लेअर ग्रेड इंग्लिश विलो क्रिकेट बॅटचा वापर करतो.या बॅटसची किंमत ६० हजार आहे.

टीम इंडियाचा कप्तान रोहित शर्मा हिटमन म्हणून ओळखला जातो. तो सीएट हिटमन इंग्लिश विलो क्रिकेट बॅट वापरतो. या बॅटसची किंमत २२ ते २५ हजार आहे. टीम इंडियाचा संकट मोचक हार्दिक पंड्या एसजी प्लेअर एडिशन इंग्लिश विलो क्रिकेट बॅट वापरतो आणि के एल राहुल व ऋषभ पंत सुद्धा याच कंपनीच्या बॅटस वापरतात. या बॅटसच्या किमती ३५ ते ४७ हजार आहेत.

भारताला पहिला वहिला टी २० वर्ल्ड कप जिंकून देणारा कप्तान महेंद्रसिंग धोनी स्पार्टन लिमिटेड एडिशन क्रिकेट बॅट वापरतो आणि वेस्ट इंडियाचा तुफानी फलंदाज क्रिस गेल सुद्धा हीच बॅट वापरतो.