जर तुम्ही समोसा प्रेमी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सोशल मीडियावर खाद्यपदार्थ आणि स्नॅक्सचे खूप मनोरंजक व्हिडिओ व्हायरल होत असले तरी आज आम्ही तुमच्यासाठी असा समोसा घेऊन आलो आहोत, जो तुम्हाला त्याच्या चवीने वेडे बनवण्यासोबतच तुम्हाला श्रीमंत देखील बनवू शकतो. हा व्हिडिओ उद्योगपती हर्ष गोयंका यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये 8 किलो वजनाचे समोसे दिसत आहेत, ज्याला पाहूनच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटले आहे.
अबब आपण पाहिला का हा 8 किलोचा ‘बाहुबली समोसा’, खाल्ल्यावर मिळणार 51 हजारांचे बक्षीस
नुकताच मेरठमधील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एका खाद्य विक्रेत्याने बनवलेला हा समोसा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. समोर आलेला हा व्हिडिओ जुना असला तरी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. काही लोक त्याची किंमत जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. हा समोसा प्रथमच जुलैमध्ये उत्तर प्रदेशातील मेरठ येथील मिठाईच्या दुकानात तयार करण्यात आला होता, त्यानंतर त्याची मागणी वाढतच गेली. हा ‘बाहुबली समोसा’ आठ किलोचा आहे, ज्यामध्ये बटाटे आणि चीज मिळेल.या समोसाची किंमत 1100 रुपये असल्याचे सांगितले जात आहे, तर अशा गोष्टीही समोर येत आहेत की, जर तुम्ही हा समोसा संपूर्ण खाल्ले तर तुम्हाला 51 हजार रुपयांचे रोख बक्षीस मिळू शकते
After all the Diwali sweets, my wife has ordered me to eat not more than one samosa today…… pic.twitter.com/WjuRObFD0T
— Harsh Goenka (@hvgoenka) October 26, 2022
.या समोशाचा व्हिडिओ पुन्हा एकदा इंटरनेटवर वाऱ्यासारखा पसरत आहे. हा व्हिडिओ उद्योगपती हर्ष गोयंका यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना हर्ष गोयंका यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘या दिवाळीत माझ्या पत्नीने सर्व मिठाईनंतर खाण्यासाठी माझ्यासाठी फक्त एक समोसा ऑर्डर केला आहे.’
