या क्रिकेटपटूंसाठी शेवटचा ठरणार टी २० वर्ल्ड कप?

१६ ऑक्टोबर पासून सुरु होत असलेल्या टी २० वर्ल्ड कपची चाहते प्रतीक्षा करत आहेत. या स्पर्धेत १६ देश सहभागी झाले असून अनेक दिग्गज खेळाडूंसाठी हा वर्ल्ड कप शेवटचा असू शकतो असे म्हटले जात आहे. या टॉप टेन मध्ये भारताचे तीन दिग्गज आहेत आणि एकूण खेळाडूत चार खेळाडूंनी कप्तान म्हणून खेळ केला आहे.

या यादीत टीम इंडियाचा विराट कोहली आहे. तो सध्या ३४ वर्षाचा आहे आणि पुढील वर्ल्ड कप पर्यंत त्याने वयाची छात्तिशी गाठलेली असेल. गेली तीन वर्षे त्याच्यासाठी फार खास राहिलेली नाहीत. शिवाय विराटचे कसोटीला अधिक प्राधान्य आहे. गेल्या टी २० मध्ये भारतात त्याने ३५ पैकी २१ सामने खेळलेले नाहीत. त्यामुळे विराट या वर्ल्ड कप मध्ये टी २० निवृत्तीची घोषणा करू शकतो असे म्हटले जात आहे.

टीम इंडियाचा कप्तान रोहित शर्मा ३६ वर्षांचा आहे. त्यानेही गेल्या वर्ल्ड कप मधील ५९ पैकी २५ सामने खेळलेले नाहीत. त्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा हा वर्ल्ड कप शेवटचा असू शकतो. टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिक आयपीएल २०२२ मध्ये चांगला चमकला असला तरी तो ही आता ३७ वर्षाचा आहे. क्रिकेट मधील सर्वात छोटा फोर्मेट टी २० मध्ये तरुण खेळाडूना अधिक संधी दिली जाते. ऋषभ पंत, ईशान किशन व संजू सॅमसन हे तरुण विकेटकीपर दिनेश ची जागा घेऊ शकतात.

अन्य क्रिकेटपटूंमध्ये ऑस्ट्रेलियाचे डेव्हिड वॉर्नर, कप्तान एरोन फीच आणि स्टीव्ह स्मिथ, न्यूझीलंडचा मार्टिन गुप्टील, अफगाणिस्तानचा कप्तान मोहम्मद नबी, इंग्लंडचा डेव्हिड मलान, बांग्ला देशचा शकीब अल हसन यांचा समावेश आहे. त्यातील बहुतेकांची ३५ आली आहे आणि बरेच सध्या चांगल्या फॉर्म मध्ये नाहीत.